मुंबई : अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याला नुकत्याच पार पडलेल्या एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात त्याच्या ‘धडक २’ (Dhadak 2) या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने केलेली एक भावनिक घोषणा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरली आहे.
काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला सिद्धांत चतुर्वेदीची भूमिका असलेला ‘धडक २’ हा चित्रपट एका महत्त्वाच्या कथानकावर आधारित आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट शेअर केली.
या पोस्टमध्ये त्याने हा पुरस्कार दिवंगत तरुण सक्षम ताटे याला समर्पित करत असल्याचे जाहीर केले.
सिद्धांत चतुर्वेदीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले की, “मी धडक २’साठी मिळालेला पुरस्कार दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय.” एका युवा कलाकाराने एका दिवंगत तरुणाला दिलेली ही भावनिक श्रद्धांजली चाहत्यांना खूप भावली आहे.





