Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्टीच्या बुक स्टॉलवर भीम अनुयायांची ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी

mosami kewat by mosami kewat
December 6, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महापरिनिर्वाण दिनानिमित्त बार्टीच्या बुक स्टॉलवर भीम अनुयायांची ग्रंथ खरेदीसाठी मोठी गर्दी
       
मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक राज्यातून आलेल्या अनुयायांनी हजारो ग्रंथ खरेदी केली.दरवर्षी लाखोच्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमी दादर येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात.

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सवलतीच्या दरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषांचे मौल्यवान ग्रंथ शिवाजी पार्क मैदानात बार्टी बुक स्टॉल वर उपलब्ध करून देण्यात आली होती.

बार्टी बुक स्टॉलचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून करण्यात आले.मंत्रीमहोदय यांच्या हस्ते अनुयायांना पुस्तकांचा संच भेट देण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम उपजिल्हाधीकारी सिद्धार्थ भंडारे, विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड, लेखाधिकारी नितिन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर आणि बार्टी संस्थेतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बार्टीच्यावतिने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना दिनांक ५ व ६ डिसेंबर रोजी बुक स्टॉलवर ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आली. तसेच दिनांक ५ , ६ डिसेंबर रोजी अनुयायांना भोजन, आणि पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.

चैत्यभूमी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मंत्री संजय शिरसाठ, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ बबन जोगदंड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

भीम अनुयायांना सेवा देण्यासाठी गेल्या तिन दिवसांपासून बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. यंदा भारतीय संविधानाचा अमॄत महोत्सव असल्यामुळे अनुयायांनी मोठ्या प्रमाणात संविधान प्रती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड खरेदी करून महामानवास अभिवादन केले.

Tags: BARTIDr Babasaheb AmbedkarMahaparinirvan dinMaharashtra
Previous Post

चैत्यभूमीवर ‘DAMA’ च्या मोफत वैद्यकीय शिबिरास ॲड. प्रकाश आंबेडकर-अंजलीताई आंबेडकरांची स्टॉलला भेट!

Next Post

‘धडक २’साठी मिळालेला पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय’; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची भावनिक पोस्ट चर्चेत!

Next Post
‘धडक २’साठी मिळालेला पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय’; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची भावनिक पोस्ट चर्चेत!

'धडक २'साठी मिळालेला पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतोय'; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची भावनिक पोस्ट चर्चेत!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
August 31, 2026
0

पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...

Read moreDetails
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

August 31, 2026
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home