कर्नाटक : कर्नाटकातील धर्मस्थळ येथील एका प्रसिद्ध धार्मिक संस्थेशी संबंधित धक्कादायक घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धर्मस्थळ येथे पूर्वी सफाई कर्मचारी म्हणून काम केलेल्या एका व्यक्तीने दावा केला आहे की, 1995 ते 2014 या कालावधीत सुमारे 100 बलात्कार पीडित मुली, महिला आणि पुरुषांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पुरण्यात आले होते. या दाव्याने राज्यात आणि देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.
धक्कादायक दावा आणि मॅजिस्ट्रेटसमोर जबाब –
बेल्थांगडी न्यायालयामध्ये 11 जुलै रोजी एका व्यक्तीने कडेकोट बंदोबस्तात प्रवेश केला. पूर्णपणे काळ्या कपड्यांमध्ये आलेल्या या व्यक्तीसोबत वकिलांचा मोठा ताफा होता. या सफाई कर्मचाऱ्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम 183 अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवला.
या व्यक्तीने आपल्या जबाबात म्हटले आहे की, तो 1995 ते 2014 पर्यंत धर्मस्थळ परिसरात सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. या काळात त्याला अनेक क्रूर हत्यांनंतर मृतदेह दफन करण्यास भाग पाडले गेले. त्याने सांगितले की, पुरलेल्या मृतदेहांमध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अनेक मुलींचा समावेश होता, ज्यांना शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागला होता.
तसेच, त्याने नग्न अवस्थेतील अनेक महिलांचे मृतदेह पाहिल्याचेही नमूद केले. या दाव्याच्या समर्थनार्थ त्याने फोटो आणि इतर पुरावेही मॅजिस्ट्रेटसमोर सादर केले आहेत.
जीवे मारण्याची धमकी आणि सुरक्षा मागणी –
सफाई कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, 1998 मध्ये जेव्हा त्याने मृतदेह दफन करण्यास नकार दिला आणि पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे तो इतकी वर्षे गप्प राहिला.
त्याने आपल्या जबाबात असेही म्हटले आहे की, धर्मस्थळ गावाभोवती अनेक ठिकाणी हे मृतदेह पुरण्यात आले होते, तर काही मृतदेह जाळण्यासाठी डिझेलचा वापरही करण्यात आला होता. यामागे काही ‘शक्तिशाली लोक’ असल्याचा दावा त्याने केला आहे. जर त्याला पुरेशी सुरक्षा मिळाली, तर तो त्या लोकांची ओळख उघड करेल, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
कर्नाटक सरकारकडून एसआयटीची स्थापना –
या गंभीर प्रकरणामुळे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांच्या एका टीमने तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी तातडीने पावले उचलली आहेत. रविवारी (20 जुलै) कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या एसआयटीचे नेतृत्व डीजीपी दर्जाचे अधिकारी प्रणब मोहंती करत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Read moreDetails