Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

शिवसेनेच्या बी. डी. चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 16, 2024
in राजकीय
0
शिवसेनेच्या बी. डी. चव्हाण यांच्यासह  पदाधिकाऱ्यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश !
       

माजी कॅबिनेट मंत्री लवकरच ‘वंचित’मध्ये येणार

अकोला : शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील संघटक आणि बंजारा समाजाचे नेते बी. डी. चव्हाण आणि अकोला जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्या गायत्रीताई कांबे, त्यांचे पती माजी तालुकाध्यक्ष संगीतराव कांबे व ओमप्रकाश पाटेकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचितमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. समाजातील अनेक समूहांना प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे दिसते. प्रस्थापित पक्षांतील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत आहेत.

सध्याचे राज्याचे राजकारण गढूळ झाले असून, या राजकारणाला स्वच्छ करण्याचं काम प्रकाश आंबेडकर हेच करू शकतात असा विश्वास कार्यकर्ते आणि जनतेला वाटत असल्याने मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहे.

बी. डी. चव्हाण यांचाही प्रवेश


शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील संघटक आणि बंजारा समाजाचे नेते बी. डी. चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात असून, वंचित बहुजन आघाडीला मात्र मोठी ताकद मिळाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक प्रस्थापित राजकीय पक्षातून नेते आणि पदाधिकारी वंचितमध्ये प्रवेश करीत आहेत.

माजी मंत्री लवकरच येणार वंचितमध्ये


महाराष्ट्रातील अनेक नेते आणि राजकीय मंडळी वंचित बहुजन आघाडीत मोठ्या प्रमाणात प्रवेश करीत असून, लवकरच एक माजी कॅबिनेट मंत्री वंचितमध्ये येणार आहे. तसेच अनेक जण वंचितमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आगामी निवडणकीत वंचित बहुजन आघाडीचे बळ वाढणार आहे.


       
Tags: AkolaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोल्यात फक्त ‘वंचित’चाच आवाज

Next Post

ठाण्यातील विद्यार्थ्यांचा ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ मध्ये प्रवेश !

Next Post
ठाण्यातील विद्यार्थ्यांचा ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ मध्ये प्रवेश !

ठाण्यातील विद्यार्थ्यांचा 'सम्यक विद्यार्थी आंदोलन' मध्ये प्रवेश !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
बातमी

‘अंतरीचे दीप’ ला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

by Akash Shelar
April 19, 2026
0

नांदेड : मराठी साहित्यात सामाजिक जाणीवा, परिवर्तनवादी दृष्टिकोन आणि मानवी मूल्यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या ‘अंतरीचे दीप’ या सर्जनशील साहित्यसंग्रहास यंदाचा...

Read moreDetails
कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

कामगारांचा असंतोष आणि आर्थिक धोरणे: केवळ वेतनवाढ पुरेशी आहे का?

April 19, 2026
काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला;  तरुणाचा दुर्दैवी अंत

काळजाचा थरकाप! चंपावतमध्ये सराव करताना विद्यार्थ्याच्या गळ्यात घुसला भाला;  तरुणाचा दुर्दैवी अंत

April 19, 2026
दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या

दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या

April 19, 2026
राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर

राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home