गंगापूर : वंचित बहुजन आघाडीच्या गंगापूर तालुका कार्यकारिणी निवड आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवार चाचपणीसाठी आज गंगापूर – वेजापूर रोडवरील हॉटेल साईप्रसाद येथे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखती संपन्न झाल्या.
या बैठकीला जिल्हा महासचिव प्रवीण हिवाळे, जिल्हा सचिव उमेश सरदार, जिल्हा सचिव संदीप जाधव, युवा जिल्हा सदस्य नितीन शेजवळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना (शिंदे गट) चे गंगापूर तालुक्यातील ५३ गावे तालुका प्रमुख राहुल पारखे आणि काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे तालुका उपाध्यक्ष भास्कर खंडागळे यांनी आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
ट्रोलर्सना अटक करा: ‘वंचित’तर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
गंगापूर तालुका कार्यकारिणी निवड मुलाखतीसाठी तालुक्यातील इच्छुक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या वेळी बाबासाहेब दुशिंग, गौतम हिवाळे, भैय्यासाहेब जाधव, अमृतराव डोंगरदिवे, कारभारी नरवडे, शांतवन उबाळे, महेंद्र शिरसाठ, नंदकुमार गाडेकर, संतोष जाधव, अमोल खडसे, दिलीप आराक, सईद बाबा पठाण, देविदास लांडे पाटील, सुशीलकुमार शिराळे, प्रमोद पतंगे, सोहेल शेख, राहुल कोळसे, अमोल साळवे आदींसह तालुक्यातील अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला असून, नवीन प्रवेशामुळे पक्ष संघटनाला अधिक बळ मिळाल्याचे जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी सांगितले.






