पुणे : कालकथित सुमनबाई सदाशिव शिंदे यांच्या चौथ्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शिंदे कुटुंबाच्या वतीने ‘प्रबुद्ध भारत’ या पक्षिकास १० हजार रुपयांचे धम्मदान देण्यात आले. रवींद्र शिंदे आणि त्यांच्या कुटुंबातील अक्षय शिंदे, ऐश्वर्या शिंदे, अक्षता शिंदे, स्वप्निल शिंदे, सूरज शिंदे आणि अथर्व शिंदे या सर्वांच्या वतीने ही मदत सुपूर्द करण्यात आली.
प्रबुद्ध भारतचे व्यवस्थापक विलास टेकाळे आणि अनिता टेकाळे यांनी हा धनादेश स्वीकारला.बहुजनांच्या हक्काचे पाक्षिक प्रबुद्ध भारतआपल्या प्रियजनांच्या स्मृती जपताना समाजाला दिशा देणाऱ्या संस्थांना बळ देणे ही काळाची गरज आहे, हा विचार समोर ठेवून शिंदे परिवाराने हे धम्मदान दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले प्रबुद्ध भारत हे बहुजनांच्या हक्काचे पाक्षिक आहे. प्रबुद्ध भारतच्या व्यवस्थापनाने शिंदे परिवाराच्या या दातृत्वाचे कौतुक केले केले.





