Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 19, 2024
in राजकीय
0
शरद पवार, उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील !
       

ॲड. प्रकाश आंबेडकर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभा

मुंबई : शरद पवार किंवा उध्दव ठाकरे यांना निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षासोबत जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत केले. ते वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, या दोन्ही नेत्यांच्या चौकशा चालू आहेत आणि त्यामुळे यांना पर्याय नाही. उद्या NRC, CAA, हिजाब किंवा औरंगजेबचा मुद्दा असेल त्यावर राष्ट्रवादीचा निवडून दिलेला खासदार त्या सभागृहात बोलणार का ? तर अजिबात नाही.

काल मुंबईमध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा होत्या त्यावर देखील आंबेडकरांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, एकदंरीत आपण पाहिले की, काल मुंबईत दोन तमाशे झाले एक शिवाजी पार्क येथे झाला आणि दुसरा बीकेसी मैदानावर झाला. एकमेकांना शिव्या घालण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काहीच नव्हते. पुढील पाच वर्षांत काय करणार? याबाबतचा त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नव्हता.

पंतप्रधनाचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असले पाहिजे, ते मानवतेचे कार्यालय न राहता आता ते वसुलीचे कार्यालय झाले आहे आणि या वसुलीमुळे २०१४ पासून १७ लाख कुटुंब की, ज्यांची मालमत्ता ५० कोटींच्या वरती आहे त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडले आणि परदेशात स्थायिक झालेत. ही सरकारी आकडेवारी आहे.

तुम्हाला मानवतेचा पंतप्रधान पाहिजे की, वसुली करणारा पंतप्रधान पाहिजे हे तुम्हाला ठरवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.


       
Tags: LoksabhamumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितचा उमेदवार निवडून आल्यास एचएएलमध्ये नोकरीच्या संधी निर्माण करू

Next Post

भारतीय रेल्वेचे 70 टक्के खासगीकरण

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र

भारतीय रेल्वेचे 70 टक्के खासगीकरण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट
बातमी

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

by mosami kewat
October 2, 2026
0

मुंबई : आयआयटी मुंबईतील स्कॉलर विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर त्याच्या न्यायासाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत....

Read moreDetails
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home