नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज दिल्लीतील RML रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 97 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.
राजकीय प्रवास आणि कारकीर्द
उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आलेल्या सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास आमदारपदापासून सुरू झाला. पुढे त्यांनी विविध राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. बिहार, गोवा, मेघालय आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या काळात जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले.
वादग्रस्त आणि परखड भूमिका
सत्यपाल मलिक हे त्यांच्या परखड आणि बिनधास्त बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले. अनेकदा त्यांनी तत्कालीन सरकारवर थेट टीका केली. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. जवानांना हेलिकॉप्टर न देता बसने पाठवल्यामुळे हा हल्ला झाला, असा त्यांचा आरोप होता, ज्यामुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती. याशिवाय, शेतकरी आंदोलनादरम्यानही त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली होती.
Anil Ambani : अनिल अंबानी ईडीच्या चौकशीला सामोरे; १७,००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी हजर
नवी दिल्ली : रिलायन्स एडीएजी समुहाचे प्रमुख, उद्योगपती अनिल अंबानी यांना १७,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी)...
Read moreDetails