Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या: मीडिया ट्रायलवर उत्कर्षा रूपवते यांचा संताप; ‘गोपनीय माहिती माध्यमांपर्यंत कशी?’

mosami kewat by mosami kewat
October 28, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या: मीडिया ट्रायलवर उत्कर्षा रूपवते यांचा संताप; 'गोपनीय माहिती माध्यमांपर्यंत कशी?'

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या: मीडिया ट्रायलवर उत्कर्षा रूपवते यांचा संताप; 'गोपनीय माहिती माध्यमांपर्यंत कशी?'

‎सातारा : फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाला पुन्हा एकदा ‘मीडिया ट्रायल’चे स्वरूप आले असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून गोपनीय चौकशीची माहिती माध्यमांपर्यंत कशी पोहोचते, तसेच खुद्द राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच एफआयआर आणि अंतरिम चौकशीचे बारकावे माध्यमांसमोर का मांडतात, असा रोकडा सवाल विचारला आहे.
‎
‎या प्रकरणी सखोल चौकशीतून पुढे आलेली माहिती पोलीस विभागानेच मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त करत, ‘कॅमेरा पुढे येण्याची एवढी हाव कसली?’ असा प्रश्न त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना विचारला आहे.

निजामी मराठ्यांपासून फारकत घेतल्याशिवाय गरीब मराठ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणार नाही – प्रकाश आंबेडकर
‎
‎’पोलीस आणि विभागाकडून दाद मिळाली नाही’
‎
‎मृत महिला डॉक्टरने वारंवार लेखी तक्रारी देऊनही त्यांना न्याय न मिळाल्याबद्दल रूपवते यांनी व्यवस्थेवर टीका केली आहे. ‘होणाऱ्या अन्यायाबद्दल वारंवार लेखी तक्रारी देऊन सुद्धा महिला डॉक्टरांना कुठलीच दाद मिळाली नाही… ना त्यांच्या स्वतःच्या डिपार्टमेंट कडून ना पोलीस खात्याकडून… याचा जाब कोणी विचारणार आहे का?’ असे गंभीर विधान त्यांनी केले आहे.
‎
‎उत्कर्षा रूपवते यांनी यावेळी पीडित कुटुंबाच्या दुःखाबद्दल सहानुभूती व्यक्त करत, त्यांच्या कुटुंबाला न्याय कसा मिळेल, या दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. ज्या आई-वडिलांनी-कुटुंबानी आपले लेकरू गमावले, त्यांच्या दुःखाचा विचार करून त्यांना त्वरित न्याय मिळवून देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
‎
‎फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने नुकतीच आत्महत्या केली होती, ज्यात त्यांनी एका पोलीस उपनिरीक्षक आणि अन्य एका व्यक्तीवर शारीरिक व मानसिक छळाचा आरोप केला होता. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Tags: DoctormediaPhaltanSataraSuicide Caseutkarsha rupwateVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

संघाला धडकी भरविणारा मोर्चा आणि ‘छेडोगे तो छोडेगे नही’ चा अभूतपूर्व इशारा

Next Post

रेवलगाव सोसायटीचे चेअरमन सलीम खॉ पठाण यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post
रेवलगाव सोसायटीचे चेअरमन सलीम खॉ पठाण यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

रेवलगाव सोसायटीचे चेअरमन सलीम खॉ पठाण यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
August 31, 2026
0

पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...

Read moreDetails
लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

लघुलेखक पद पुनर्जीवित करून १०० टक्के रिक्त पदांची भरती करा; नांदेडमधील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना वंचित युवा आघाडीचा पाठिंबा

August 31, 2026
पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यात’भटके-विमुक्त दिन’ भव्य राज्यस्तरीय परिषदेला सुरुवात; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

August 31, 2026
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

August 31, 2026
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home