मुंबई : हरियाणातील आयपीएस अधिकारी पुरन कुमार यांनी जातीभेदातून त्रस्त होऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सनातन धर्मावर तीव्र प्रहार केला आहे.
आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले आहे की, “सनातन धर्म = अस्पृश्यता. सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो आणि जीव घेतो!”
यासोबत त्यांनी डॉ. पायल तडवी, डॉ. रोहित वेमुला, आयपीएस अधिकारी पुरन कुमार आणि नांदेड मधील हत्या झालेले अक्षय भालेराव यांचे फोटो शेअर केले आहेत. या सर्वांचा मृत्यू जातीय भेदभाव आणि सामाजिक दडपशाहीमुळे झाल्याचं त्यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हटले आहे की, देशात अजूनही सनातनी विचारसरणीच्या प्रभावामुळे दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांना अन्याय सहन करावा लागत आहे. “अस्पृश्यता ही फक्त सामाजिक समस्या नाही, तर ती जीवघेणी व्यवस्था आहे,” असेही त्यांनी नमूद केले.