जळगाव जामोद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह, जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या रस्त्याच्या आणि प्रकाशाच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण मागण्या मान्य झाल्याने यशस्वीरित्या स्थगित करण्यात आले.
वस्तीगृहात ये-जा करण्यासाठी योग्य रस्त्याचा अभाव आणि परिसरात अंधारमय वातावरण ही गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या होती. रस्त्याचे डांबरीकरण करणे आणि हायमास्ट लाईटची व्यवस्था करणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, केवळ आश्वासनांपुरतेच मर्यादित प्रतिसाद मिळाल्याने जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर यांनी ३० जून २०२५ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
प्रशासनाच्या उदासीनतेला गंभीरपणे घेत, त्यांना जागे करण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले होते. दुसऱ्याच दिवशी लेखी यश आंदोलनाच्या तीव्रतेमुळे प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच १ जुलै रोजी, तहसीलदार, जळगाव जामोद यांच्या उपस्थितीत प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बैठक झाली.
या बैठकीत आंदोलकांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्या. डांबरी रस्त्याचे काम दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल आणि तोपर्यंत तात्पुरती पर्यायी व्यवस्था म्हणून खडक टाकून कच्चा रस्ता तयार केला जाईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आमरण उपोषणाची यशस्वीरित्या सांगता करण्यात आली.
आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा या यशस्वी आंदोलनात फुले-आंबेडकर विद्वात सभेचे राज्य समन्वयक प्रा. मनोजजी निकाळजे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, दक्षिण जिल्हाध्यक्ष निलेशभाऊ जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विशाखाताई सांवग, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, भारतीय बौद्ध महासभा महिला जिल्हाध्यक्षा छायाताई बांगर, विद्वात सभेचे जिल्हा समन्वयक प्रा. दिलीप कोकाटे, ॲड. रागिणीताई तायडे, मंगलाताई पारवे, गौतम इंगळे, गिरीश उमाळे,
नांदुरा तालुकाध्यक्ष आजाबराव वाघोदे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदिश हातेकर, गौतम सुरवाडे, वंचितचे मा. तालुकाध्यक्ष संतोष गवई, बाजार समिती उपसभापती प्रशांत अवसरमोल, रतन नाईक, सुनील बोदडे, देवा दामोदर, विजय सातव, शहराध्यक्ष आझम कुरेशी, संतोष पवार, राजरत्न वाकोडे, रोशन तायडे, रविंद्र वानखडे, दिलीप दामोदर, विजय दामोदर, प्रशांत नाईक, विकी दामोदर, चेतन तायडे,
भास्कर जुबंळे, सुभाष सिरसाठ, सुरेश वाघोदे, मयुर खंडेराव, आदित्य खंडेराव तसेच वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, फुले आंबेडकर विद्वत सभा आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या विजयामुळे विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित समस्या सुटण्यास मदत झाली आहे.
संगमनेरमधील पल्लवी गंगावणे प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी
अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील इंदिरा नगर येथील पल्लवी सागर गंगावणे यांच्यावर झालेल्या विनयभंग, मारहाण, चोरी आणि बदनामीच्या प्रकरणात संबंधित आरोपींवर...
Read moreDetails