ठाणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा कमिटीने दहावी सराव परिक्षेचे वर्ग आयोजित केले आहे.

अनेक विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा कठीण वाटतं असते, मात्र सरावाने ही परीक्षा सोप्पी होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करून घवघवीत यश संपादन करावे या उद्देशाने सम्यक विद्यार्थी आंदोलन, ठाणे जिल्ह्याच्या वतीने दहावी सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.