‘वंचित’चा दणका; उद्यापासून सोलापुरात केस कर्तनयाला परवानगी

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

टीम प्रबुद्ध भारत –

सोलापुर ः कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाज घटकावर याचा मोठा परिणाम दिसून आलाय. सलून व्यवसायिकांची बिकट अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २५ जून रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी नाभिक बांधवांच्या समस्या त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेऊन सलून व्यवसायिकांना दुकाने उघाडण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर २४ तासातच सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी काही अटी, शर्तींवर सलून, ब्यूटी पार्लर उघडायला परवानगी दिली. यामुळे सलून व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वंचितच्या या भूमिकेमुळे सलून व्यवसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

One thought on “‘वंचित’चा दणका; उद्यापासून सोलापुरात केस कर्तनयाला परवानगी

 • June 27, 2020 at 3:07 pm
  Permalink

  महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडी सांभाळतेय आणि विरोधी पक्षांवर वारंवार राज्यपालांची भेट घ्यावी लागते सत्ता गेलेली असल्यानेच हे अशी फडफड होतेय विरोधी पक्षांना सामान्य माणसांचे काही ही घेणे देणे नाही. पुढील काळात वंचित आघाडी नक्कीच सामान्य माणसांपर्यंत पोहोचेल म्हणून..
  छु ना सको “आसमान” ….तो ना सही ….
  लोगों के “दिल” को छूने का आनन्द भी आसमान छूने से कम नहीं !!! जय भिम
  वंचित बहुजन आघाडी माढा तालुका सोलापूर जिल्हा

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *