बोरगाव – जालना तालुक्यातील बोरगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त एक भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह जिल्हा सचिव गणेश खरात, दिलीप मगर, गौतम मगर, गणेश डोके, एकनाथ दसरथ डोके, मदन डोके, अर्जुन डोके, आणि अनेक समाजबांधवांची उपस्थिती होती. गावातील शामराव लोंढे, दामोदर लोंढे, दीपक दत्ता डोके, प्रदीप डोके, आनंद लोंढे, आकाश लोंढे, भीमराव लोंढे, प्रकाश लोंढे, रामलाल पत्ते, गणेश पत्ते, आणि महिलांमध्ये शांताबाई लोंढे, सोनाबाई लोंढे, रंजना लोंढे, कुशीवर्ताबाई लोंढे, प्रतीक्षा लोंढे, सुनीता लोंढे, गुंफाबाई लोंढे, कविता लोंढे यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. बालू गोरे यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थ आणि समाजबांधवांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत अनेक वक्त्यांनी त्यांच्या साहित्य आणि संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, अभिवादन सभा आणि सामाजिक सलोख्याचे प्रतिकात्मक उद्गार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रम उत्साहात आणि समाजाभिमुख वातावरणात संपन्न झाला
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप: माझ्या मुलाचा खोटा रिपोर्ट तयार केला ; राहुल गांधी, शरद पवार, विजयाबाई सूर्यवंशी यांची टीका
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि वडार समाजाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजातर्फे पुण्यात भव्य सत्कार करण्यात...
Read moreDetails