Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त  वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

mosami kewat by mosami kewat
February 5, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
प्रबुद्ध भारत वर्धापन दिनानिमित्त  वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव!
       

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ४ फेब्रुवारी १९५६ रोजी सुरू केलेल्या प्रबुद्ध भारत या ऐतिहासिक पाक्षिकाच्या 70 vya वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून वाचक, कार्यकर्ते, अभ्यासक आणि आंबेडकरी विचारवंतांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या कार्यालयाला भेट देऊन शेकडो वाचक, वितरक, जाहिरातदार आणि हितचिंतकांनी प्रबुद्ध भारतला शुभेच्छा दिल्या. “ज्या चळवळीचे मुखपत्र नसते तिची अवस्था पंख छाटलेल्या पक्षांप्रमाणे असते” हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याची भावना अनेक वाचक, अभ्यासक, हितचिंतकांनी व्यक्त केली. आंबेडकरी चळवळीचे मुखपत्र म्हणून प्रबुद्ध भारतने गेली अनेक दशके सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा आवाज सातत्याने बुलंद केला आहे. (Prabuddha bharat aniversary)

आज ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली प्रबुद्ध भारत आंबेडकरी विचारांचा वसा आणि वारसा पुढे नेत असल्याबद्दल वाचकांनी समाधान व्यक्त केले. “प्रबुद्ध भारत केवळ वृत्तपत्र नाही, तर चळवळीचे वैचारिक शस्त्र आहे,” अशी भावना अनेक शुभेच्छा संदेशांतून व्यक्त होत आहे.

वर्धापन दिनानिमित्त प्रबुद्ध भारतने १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत विशेष सवलतीसह सभासद नोंदणी अभियान सुरू केले असून, त्रैवार्षिक सभासदत्वासाठी १५०० रुपयांऐवजी केवळ १२०० रुपये त्रैयवार्षिक वर्गणी आकारण्यात येत आहे. या उपक्रमाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने नवीन सभासद नोंदणी होत आहे. (Prabuddha bharat aniversary)

प्रबुद्ध भारत कायमस्वरूपी सुरू राहावा, ही आपली सर्वांची जबाबदारी असून बाबासाहेबांना तेच खरे अभिवादन ठरेल अशी भावना अनेक वाचकांनी व्यक्त करून  प्रबुद्ध भारतला आर्थिक पाठबळ देण्याची तयारी दर्शवली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणे आणि बाबासाहेबांनी चळवळीला दिलेले मुखपत्र अव्याहतपणे सुरू ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रबुद्ध भारत अखंडपणे सुरू राहण्यासाठी बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीनिमित्त ज्यांना शक्य आहे त्यांनी 135 रुपयांपासून स्वेच्छेने प्रबुद्ध भारताला मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. (Prabuddha bharat aniversary)

वर्धापन दिनानिमित्त शेकडो वाचक, जाहिरातदार, वितरक आणि हितचिंतकांकडून मिळालेल्या शुभेच्छा बाबासाहेबांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी उभारी देणाऱ्या आहेत. “प्रबुद्ध भारत घरोघरी पोहोचवणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना प्रबुद्ध भारतच्या संपादक मंडळाने व्यक्त केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित विशेषांक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या वतीने जयंती विशेषांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होणाऱ्या या विशेषांकासाठी शुभेच्छा जाहिराती आणि अभ्यासपूर्ण लेख स्वीकारण्यात येणार आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 02024475889 या क्रमांकावर सकाळी 11 ते 6 या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


       
Tags: ConstitutioncrimeDr Babasaheb AmbedkarDr. B.R. AmbedkarElectionentertainmentpolticsPrabuddha bharat aniversarysocial media
Previous Post

प्रस्थापितांनी विकासनिधी लुटला; स्थानिक प्रश्नांसाठी ‘वंचित’ला विजयी करा: सुजात आंबेडकर

Next Post

ग्रामीण समस्यांवर सुजात आंबेडकरांचा प्रहार; पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा

Next Post
ग्रामीण समस्यांवर सुजात आंबेडकरांचा प्रहार; पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा

ग्रामीण समस्यांवर सुजात आंबेडकरांचा प्रहार; पैठणमध्ये वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home