RBI UPI Rules : आजकाल अनेक जण रोख पैशांऐवजी डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. पूर्वी बँकेत जाऊन रांगेत उभं राहून पैसे काढणे किंवा जमा करणे आवश्यक असायचे, तसेच चेकचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. एका क्लिकवरून तुम्ही थेट तुमच्या खात्यातून व्यवहार करू शकता.
Also Read : मराठवाडा हादरला! परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑनलाइन पेमेंट प्रणालीमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. जर तुम्ही UPI, फोन पे, किंवा गुगल पे सारख्या अॅप्सचा वापर करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ऑनलाइन व्यवहार करताना फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी RBI ने काही नवीन नियम लागू केले आहेत. चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यास किंवा फसव्या कॉलमुळे खाते रिकामं होण्याच्या घटना टाळण्यासाठी हे उपाय केले गेले आहेत.
नवीन नियमांनुसार, जर तुम्ही १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करत असाल, तर ती रक्कम लगेच समोरच्या खात्यात जमा होणार नाही. त्यासाठी किमान १ तासाचा कालावधी दिला जाईल. या दरम्यान तुम्हाला व्यवहार संशयास्पद वाटल्यास तुम्ही तो थांबवू शकता. याशिवाय, ‘किल स्विच’ नावाची एक नवीन सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. जर तुमचा मोबाईल हरवला किंवा हॅक झाला, तर या सुविधेच्या मदतीने तुम्ही तुमचे सर्व व्यवहार तात्काळ थांबवू शकता.
Also Read : राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर अधिक पडताळणीची अट ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांची सुरक्षितता अधिक वाढेल. हे नियम लागू करण्यापूर्वी RBI ने हे नवे नियम लागू होण्यापूर्वी ८ मे पर्यंत नागरिकांना आपलं मत मांडण्याची संधी दिली आहे.






