Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मराठवाडा हादरला! परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

mosami kewat by mosami kewat
April 11, 2026
in बातमी, सामाजिक
0
मराठवाडा हादरला! परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मराठवाडा हादरला! परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नांदेड : मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात आज सकाळी सुमारे ८:४५ ते ८:४७ दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जमिनीखालील हालचालींमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. काही ठिकाणी धक्क्यांचा परिणाम इतका जाणवला की घरांवरील पत्रे उडाली आणि जुन्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर धाव घेत मोकळ्या जागेकडे गेले. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Also Read : राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

विशेषतः हिंगोली जिल्ह्यात या भूकंपाचा तीव्र परिणाम दिसून आला. घरातील भांडी आणि इतर वस्तू खाली पडल्या, तर अनेक कच्च्या आणि पक्क्या घरांमध्ये भेगा पडल्या. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे असल्याचे समोर आले आहे. (MarathwadaEarthquake)

सुमारे १० किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. या धक्क्यांचे परिणाम आसपासच्या जिल्ह्यांमध्येही दिसून आले. नांदेड शहरातील सिडको, वजीराबाद आणि तरोडा सांगावी भागांसह यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काही भागांमध्येही सौम्य हादरे जाणवले.

Also Read : पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Breaking NewsDisaster AlertHingoli EarthquakeMaharashtranandedNanded newsparbhaniSeismic Activity
Previous Post

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू

Next Post

RBI UPI Rules : PhonePe, Google Pay वापरताय? मग हे वाचाच! RBI कडून ‘किल स्विच’सह मोठे बदल लागू

Next Post
RBI UPI Rules : PhonePe, Google Pay वापरताय? मग हे वाचाच! RBI कडून 'किल स्विच'सह मोठे बदल लागू

RBI UPI Rules : PhonePe, Google Pay वापरताय? मग हे वाचाच! RBI कडून 'किल स्विच'सह मोठे बदल लागू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के
बातमी

वंचित बहुजन आघाडीची कळंब तालुका आढावा बैठक संपन्न; ‘गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता’ निर्माण करा : धनंजय सोनटक्के

by mosami kewat
August 31, 2026
0

कळंब : वंचित बहुजन आघाडीच्या कळंब तालुका पक्ष संघटनेची मासिक आढावा बैठक कळंब येथील तथागत बुद्ध विहार येथे उत्साहात पार...

Read moreDetails
उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

उपक्रमाच्या नावाखाली ४९० आदिवासी वसतिगृहांमध्ये संघाचा वैचारिक अजेंडा?

August 31, 2026
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; दोन दिवसांत अटकेचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांचे आश्वासन

August 30, 2026
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

August 30, 2026
धोरणात्मक दिवाळखोरी!

धोरणात्मक दिवाळखोरी!

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home