Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला

mosami kewat by mosami kewat
March 1, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Nanded: तुप्पा येथे माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समाजप्रबोधन, मिरवणूक आणि अन्नदानाने परिसर दुमदुमला
       

नांदेड : नांदेड दक्षिण तालुक्यातील तुप्पा येथे त्यागमाता रमाई आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात समाजप्रबोधनपर व्याख्यान, भव्य मिरवणूक आणि अन्नदान अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पंचशील बुद्ध विहार परिसर येथे वंचित बहुजन आघाडीचे (नांदेड दक्षिण) जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधर महाजन यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजारोहणाने झाली. या सोहळ्याचे उद्घाटन युवा नेते व प्रदेश सदस्य अविनाश भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संघरत्न कुऱ्हे होते.

जयंतीनिमित्त नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सत्यपाल सावंत, नगरसेवक प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे आणि वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिव पदी निवड झाल्याबद्दल रवि पंडित यांचा जयंती मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

गावातील प्रमुख रस्त्यावरून माता रमाई आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक आणि गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखाव्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील कदम, प्रा. सुरेश शेळके, कैलास वाघमारे, अरुण भद्रे, रंगनाथ गजले, पी.एम. वाघमारे, संजय टिके, ॲड. जयपाल ढवळे, सुरेश गजभारे, गणपत सवयीसोनकांबळे, नामदेव पांचाळ, विद्यानंद पवळे, भगवानराव हनुमंते, रत्नपाल माने, प्रकाश कोल्हे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रोहित राजेश पंडित, उपाध्यक्ष सुनील डोईबळे, सचिव राहुल पंडित, कोषाध्यक्ष अमित पंडित, सहसचिव अविनाश डोईबळे आणि सल्लागार भूषण पंडित यांनी परिश्रम घेतले. उत्सवाचे गांभीर्य आणि गर्दी लक्षात घेता, ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय केंद्रे, ज्ञानेश्वर मठवाड, बिट जमादार टिपरसे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक रवि पंडित यांनी केले, तर सूत्रसंचालनाची धुरा भीमशाहीर क्रांती कुमार पंडित यांनी सांभाळली. भारतीय बौद्ध महासभेचे भदंत संगप्रिय आणि का. का. पंडित यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना व पूजापाठ संपन्न झाला. या सोहळ्याला मिराताई बचत गटाच्या महिलांसह मोठ्या संख्येने युवक आणि समाजबांधव उपस्थित होते.


       
Tags: BuddhistDr Babasaheb AmbedkarMaharashtraMata ramainandedRamabai Ambedkar Jayanti
Previous Post

भारत सरकारने इराण के साथ खडा रेहना चाहीये : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

Next Post
Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
बातमी

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

by mosami kewat
April 12, 2026
0

Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home