Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुरी येथील मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार

mosami kewat by mosami kewat
July 20, 2026
in बातमी, राजकीय, सांस्कृतिक
0
पुरी येथील मातंग समाजाने वंचित बहुजन आघाडीचे मानले आभार
       
औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील पुरी गावातील मातंग वस्तीवर १४ जुलै रोजी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल पुरी गावातील मातंग समाजातील महिला व पुरुषांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले.

याप्रसंगी समाजबांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भविष्यातही आपण कायम वंचित बहुजन आघाडीसोबत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

१४ जुलै रोजी पुरी येथील मातंग वस्तीवर कथित वाळू तस्करांनी हल्ला केल्यानंतर रुपचंद गाडेकर यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर १७ जुलै रोजी त्यांनी पुरी गावात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झाली आहे का, तसेच तपासाची सद्यस्थिती काय आहे, याबाबत माहिती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ २० जुलै रोजी गंगापूरचे पोलिस उपअधीक्षक यांची भेट घेणार असल्याची माहिती समाजबांधवांना देण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कोमलताई हिवाळे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब दुशिग, तालुका उपाध्यक्ष भास्कर खंडागळे, सरला जाधव, ज्योती जाधव, सुमित जाधव, शुभम इगे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: aurangabadcrimeMaharashtraPolitical
Previous Post

सावधान! शाळांच्या ५०० मीटर आवारात कॅफीनयुक्त पेये विकल्यास अन्नसुरक्षा कायद्यानुसार सक्त कारवाई

Next Post

स्मार्ट मीटर हटवा, बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीचे मुर्तिजापूरमध्ये निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न
बातमी

शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न

by mosami kewat
August 30, 2026
0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भाजप-आरएसएस यांच्यातील अलीकडच्या राजकीय जवळिकीवरून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी...

Read moreDetails
धोरणात्मक दिवाळखोरी!

धोरणात्मक दिवाळखोरी!

August 30, 2026
प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सल्ला; खर्गेवरील अन्यायप्रकरणी ‘वॉक द टॉकमध्ये’ राहुल गांधी अपयशी!

August 30, 2026
झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

August 30, 2026
बोगस बियाणे विरोधात दाखल तक्रारीवर महाबीज अधिकारी ह्यांना देखील अटक करून शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्यात यावी – राजेंद्र पातोडे 

बोगस बियाणे विरोधात दाखल तक्रारीवर महाबीज अधिकारी ह्यांना देखील अटक करून शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्यात यावी – राजेंद्र पातोडे 

August 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home