Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune : पर्यावरणपूरक जीवनशैली, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन; ३० हून अधिक पुस्तके लिहिली

mosami kewat by mosami kewat
September 20, 2025
in बातमी
0
Pune : पर्यावरणपूरक जीवनशैली, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन; ३० हून अधिक पुस्तके लिहिली

Pune : पर्यावरणपूरक जीवनशैली, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन; ३० हून अधिक पुस्तके लिहिली

पुणे : विजेचा आणि विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर टाळून निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने (वय ८५) यांचं शुक्रवारी (१९ सप्टेंबर) निधन झालं. त्या अविवाहित होत्या.

१९४० मध्ये जन्मलेल्या डॉ. साने यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली होती. तसेच, त्यांनी भारतविद्या शास्त्रातही एम.ए. आणि एम.फिल. संपादन केलं होतं. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केलं आणि त्याच पदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या.

केवळ वनस्पतिशास्त्रच नाही, तर इतिहासाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्या पुण्याच्या जोगेश्वरी मंदिरासमोरील शीतलादेवी पार भागातील एका जुन्या वाड्यात राहत होत्या. या वाड्याला त्यांनी एक प्रकारे निसर्गाचं घरच बनवलं होतं, जिथे त्यांच्यासोबत चार मांजरी, एक मुंगूस, एक घुबड आणि भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या यांसारख्या अनेक पक्ष्यांचाही निवास होता.

डॉ. साने यांनी आयुष्यभर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब केला. त्यांच्या घरात विजेचा वापर नव्हता, त्यामुळे आधुनिक उपकरणांचा मागमूसही नव्हता. नोकरीच्या शेवटच्या १० वर्षांत त्यांनी लुना वापरली, पण त्याआधी आणि त्यानंतर त्या कामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी पायीच प्रवास करत. विहिरीवरून पाणी आणणं, सूर्यप्रकाश आणि कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करणं हे त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा भाग होता.

विजेविना जीवन जगूनही त्यांनी वनस्पतिशास्त्र, पर्यावरण, इतिहास आणि प्राच्यविद्या अशा विविध विषयांवर ३० हून अधिक पुस्तकं लिहिली. अलीकडच्या काळात त्यांनी फक्त सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिव्याचा वापर सुरू केला होता.

डॉ. साने यांची उल्लेखनीय ग्रंथसंपदा:

  • आपले हिरवे मित्र
  • पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष (डॉ. विनया घाटे यांच्यासह)
  • बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष
  • सम्राट अशोकावरील ‘देवानंपिय पियदसी राजो अशोक’
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तके (ज्यात बायोलॉजी आणि इंडस्ट्रीयल बॉटनी यांसारख्या पुस्तकांचा समावेश आहे)

Tags: dr hema saneeco-friendly livingenvironmental lifestyleHema Sane booksIndian botanist obituaryMaharashtranature conservationistplant science bookspunePune botanistsustainable lifestyle
Previous Post

Nashik : लासलगाव ऑनर किलिंग प्रकरणी वाढीव कलम दाखल न झाल्यास रस्त्यावर आंदोलनाचा इशारा – चेतन गांगुर्डे

Next Post

गायक-संगीतकार झुबीन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग करताना निधन; ‘या अली’ गाण्यामुळे मिळाली होती लोकप्रियता

Next Post
गायक-संगीतकार झुबीन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग करताना निधन; 'या अली' गाण्यामुळे मिळाली होती लोकप्रियता

गायक-संगीतकार झुबीन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग करताना निधन; 'या अली' गाण्यामुळे मिळाली होती लोकप्रियता

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Prakash Ambedkar : भारताविरुद्ध ट्रम्प यांचे ‘मूक युद्ध’ सुरू; H1B व्हिसा शुल्क वाढीवरून प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका
बातमी

Prakash Ambedkar : भारताविरुद्ध ट्रम्प यांचे ‘मूक युद्ध’ सुरू; H1B व्हिसा शुल्क वाढीवरून प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

by mosami kewat
September 20, 2025
0

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केल्याच्या वृत्तावरून वंचित बहुजन...

Read moreDetails
Bhandara Protestसाकोलीत ओबीसी समाजाचा मोर्चा, २ सप्टेंबरचा जीआर जाळून निषेध

Bhandara Protest : साकोलीत ओबीसी समाजाचा मोर्चा, २ सप्टेंबरचा जीआर जाळून निषेध

September 20, 2025
गायक-संगीतकार झुबीन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग करताना निधन; 'या अली' गाण्यामुळे मिळाली होती लोकप्रियता

गायक-संगीतकार झुबीन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग करताना निधन; ‘या अली’ गाण्यामुळे मिळाली होती लोकप्रियता

September 20, 2025
Pune : पर्यावरणपूरक जीवनशैली, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन; ३० हून अधिक पुस्तके लिहिली

Pune : पर्यावरणपूरक जीवनशैली, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन; ३० हून अधिक पुस्तके लिहिली

September 20, 2025
Nashik : लासलगाव ऑनर किलिंग प्रकरणी वाढीव कलम दाखल न झाल्यास रस्त्यावर आंदोलनाचा इशारा - चेतन गांगुर्डे

Nashik : लासलगाव ऑनर किलिंग प्रकरणी वाढीव कलम दाखल न झाल्यास रस्त्यावर आंदोलनाचा इशारा – चेतन गांगुर्डे

September 20, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home