Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

mosami kewat by mosami kewat
April 9, 2026
in बातमी
0
पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

पुणे : पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळेच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करत तब्बल ७ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणात पोलिस खात्यातीलच एका अधिकाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. (Pune Principal Blackmail)

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील ‘रील स्टार’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. तिघांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Also Read : बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित प्राचार्यांना त्यांच्या काही वैयक्तिक बाबी उघड करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. ही माहिती सार्वजनिक करण्याची भीती दाखवत त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली. दबावाखाली प्राचार्यांनी सुमारे ७ लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे. (Pune Principal Blackmail)

घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करत कारवाईचे आदेश दिले. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिस विभागातीलच अधिकारी सामील असल्याने संपूर्ण यंत्रणेतच मोठी खळबळ उडाली आहे.

Also Read : ट्रम्प यांचा ‘चिकन आऊट’ पॅटर्न: दोन आठवड्यांचा सुस्कारा, पण पुढे काय?

या घटनेमुळे कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. (Pune Principal Blackmail)

दरम्यान, आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारे इतर कोणाला ब्लॅकमेल केले आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. संबंधित प्राचार्यांकडून अधिक माहिती घेतली जात असून, लवकरच या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: 7 Lakh ExtortionBlackmailCrime newsLaw And OrderMaharashtra newsMaharashtra policePolice CasePolice CorruptionPrincipal BlackmailPSIPublic safetypunePune ExtortionPune Principal Blackmail
Previous Post

बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा
बातमी

पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

by mosami kewat
April 9, 2026
0

पुणे : पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळेच्या प्राचार्यांना ब्लॅकमेल करत तब्बल ७ लाख रुपयांची...

Read moreDetails
बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे

बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे

April 9, 2026
ट्रम्प यांचा 'चिकन आऊट' पॅटर्न: दोन आठवड्यांचा सुस्कारा, पण पुढे काय?

ट्रम्प यांचा ‘चिकन आऊट’ पॅटर्न: दोन आठवड्यांचा सुस्कारा, पण पुढे काय?

April 9, 2026
राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ

राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ

April 9, 2026
खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

खानवडीत ‘पीपीपी’ शाळा प्रकल्पावरून वाद; वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप

April 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home