पुणे : बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रवाशाकडून तब्बल ६ कोटी रुपये किमतीचा ६ किलो १४४ ग्रॅम उच्च प्रतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही घटना गेल्या १५ दिवसांतील दुसरी असल्यामुळे विमान प्रवाशांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय टोळी अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचा संशय बळावला आहे.
अतुल सुशील हिवाळे (वय ४३, रा. पिंपरी-चिंचवड) असं अटक केलेल्या प्रवाशाचं नाव आहे. तो मंगळवारी बँकॉकहून पुण्यात आला होता. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान, त्याच्या बॅगेत १२ सीलबंद पॅकेट्समध्ये हिरव्या रंगाचा, तीव्र वास येणारा सुकलेला पदार्थ आढळला. प्राथमिक चाचणीत तो उच्च प्रतीचा गांजा असल्याचे समोर आलं.
आरोपीविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याआधीही अशीच घटना गेल्या महिन्यात घडली होती, ज्यात एका प्रवाशाकडून १०.४७ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला होता, ज्याची अंदाजे किंमत साडेदहा कोटी रुपये होती. या दोन्ही घटनांमुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, यामागे कोणती आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहे, याचा शोध घेतला जात आहे.
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...
Read moreDetails