Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune Crime News : ‘लिपस्टिक’ने लिहिली अखेरची चिठ्ठी; विवाहितेची चिमुकल्यासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

mosami kewat by mosami kewat
June 19, 2025
in बातमी, विशेष, सामाजिक
0
पुणे: 'लिपस्टिक'ने लिहिली अखेरची चिठ्ठी; विवाहितेची चिमुकल्यासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुणे: 'लिपस्टिक'ने लिहिली अखेरची चिठ्ठी; विवाहितेची चिमुकल्यासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

       

पुणे : पुण्यातील आंबेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ३१ वर्षीय महिलेने आपल्या ६ वर्षाच्या मुलासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. यात महिलेचा आणि चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. नंदेच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती समोर आली.

मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१, दळवी नगर, आंबेगाव) आणि विष्णु शशिकांत देशमुख (वय ६) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.

घटनेची चौकशी करत असताना पोलिसांना लिपस्टिकने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ज्यामध्ये महिलेने आत्महत्या केल्याचे कारण नमूद केलेले आहे. नंदेच्या त्रासाला कंटाळून मी हा निर्णय घेत आहे असे चिठ्ठीत लिहिलेले होते. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून, तिच्या नातेवाईकांना याची माहिती दिली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवाशी असलेल्या मयुरी पती आणि सहा वर्षे मुलासोबत आंबेगाव बुद्रुक येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या पतीसह खामगाव येथे गेल्या होत्या. मात्र तिथे गेल्यानंतर सासरच्या लोकांसोबत त्यांचे भांडण झाले. आणि त्यानंतर मुलाला घेऊन त्या एकट्याच पुण्यात परतल्या होत्या. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांनी राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवरून मुलासह खाली उडी मारली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.


       
Tags: crimejumpingLipstickpunepune crime newssuicidewoman
Previous Post

इराण-इस्रायल संघर्षाच भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; प्रकाश आंबेडकर यांची केंद्राला निर्णय घेण्याचे आवाहन

Next Post

Prataprao Jadhav : शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा – प्रतापराव जाधव

Next Post
शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा - प्रतापराव जाधव

Prataprao Jadhav : शरद पवारांनी वेळोवेळी भाजपला मदत केलीय, राज्यात भाजपचं सरकार आणण्यात त्यांचा सिंहाचा नाही तर हत्तीचा वाटा - प्रतापराव जाधव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोला जि.प. प्रभाग रचनेवर वंचित बहुजन आघाडीच्या हरकती; ११ ऑगस्टला निर्णय
बातमी

अकोला जि.प. प्रभाग रचनेवर वंचित बहुजन आघाडीच्या हरकती; ११ ऑगस्टला निर्णय

by mosami kewat
August 6, 2025
0

अकोला : अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेबाबत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या आक्षेपांवर आणि हरकतींवर अमरावती येथे विभागीय...

Read moreDetails
पाटोदा साठवण तलावातील पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पाटोदा साठवण तलावातील पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

August 6, 2025
Anil Ambani : अनिल अंबानी ईडीच्या चौकशीला सामोरे; १७,००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी हजर

Anil Ambani : अनिल अंबानी ईडीच्या चौकशीला सामोरे; १७,००० कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी हजर

August 5, 2025
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरं उद्धवस्त, बचावकार्य सुरू

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे हाहाकार, अनेक घरं उद्धवस्त, बचावकार्य सुरू

August 5, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन

August 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home