रशियाच्या तेलाचा फायदा सरकारला नाही, तर अंबानीच्या खासगी कंपनीला!’
पटना : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पटना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू (एनडीए) युतीविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
ते म्हणाले की, आरएसएस-भाजपाला देशाचे संविधान बदलयाचे आहे. देशाला वाचवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि पेरियार स्वामी यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आम्ही या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू (एनडीए) युतीच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करतो.
आम्ही तुम्हाला कोणाला मतदान करायचे हे सांगणार नाही, परंतु तुम्ही एनडीए युतीच्या विरोधात मतदान करून देश वाचवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कच्च्या तेलाच्या खरेदीवरून केंद्र सरकारवर टीका –
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रशियाकडून भारताने खरेदी केलेल्या स्वस्त कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. “भारताने रशियाकडून जे स्वस्त कच्चे तेल खरेदी केले आहे, त्याचा फायदा भारत सरकारला न होता, उलट भारतातील खासगी कंपन्या रिलायन्स ऑईल आणि नायरा कंपनीला होत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.
“जग म्हणत आहे की, ही आर्थिक व्यवस्था (इकॉनॉमिक सिस्टीम) योग्य नाही. जर याचा फायदा भारत सरकारला झाला असता आणि देशातील डिझेल, पेट्रोलचे दर कमी झाले असते, तर हे धोरण लोकांसाठी आहे, असे मानले गेले असते,” असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुमन गौरकार यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश!
भारत सरकारचे हे धोरण खासगी कंपन्यांसाठी आहे. जर उद्या या खासगी कंपन्या इतर देशांतील कंपन्यांसोबत बाजारपेठेत उतरल्या, तर याचा फटका त्या देशाला बसेल. यामुळेच त्यांनी भारतावर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर भाष्य केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला पाठिंबा न मिळाल्याच्या घटनेचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, “ऑपरेशन सिंदूरनंतर कोणताही मोठा देश आमच्यासोबत उभा राहिला नाही. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, तुर्की, चीन आणि रशियासुद्धा पाकिस्तानसोबत उभे राहिले.”
https://youtu.be/vmJsitz_nqE?si=jRK7uTOz4FCMWzLR
पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपवर संविधानाच्या बदलाच्या संदर्भात गंभीर आरोप केला. ते म्हणाले, “आरएसएस-भाजपला देशाचे संविधान बदलायचे आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, पेरियार स्वामी यांना मानणारे जे लोक आहेत, त्यांना आमचे आवाहन आहे की, जर देशाला वाचवायचे असेल, तर या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू (एनडीए) युतीविरोधात आपले मत द्या,” असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.
कोणत्या पक्षाला मत द्यायचे हे सांगितले नाही, पण “कोणाला मत द्यायचे, हे आम्ही सांगणार नाही, पण एनडीए युतीविरोधात आपले मत देऊन देशाला वाचवायचे आहे” अशी भूमिका त्यांनी मांडली.






