मालेगाव : 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात बॉम्बस्फोट झाला होता. उद्या दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर हे मालेगावात पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत. हा निकाल आल्यानंतर ”हा बॉम्बस्फोट घडवला कोणी”? “त्या 6 लोकांना कोणी मारले?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला होता.
वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते तय्यब जफर यांनी काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फोनवर फोनवर पीडित कुटुंबियांशी संवाद साधला होता. त्यावेळी नातलगांनी ‘आम्हाला न्याय पाहिजे”, अशी मागणी केली होती.
यावेळी त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, माजी आमदार खतीब सैय्यद नातीकोद्दीन, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यता दिशा पिंकी शेख, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, इम्तियाज नदाफ आदी उपस्थित राहणार आहेत.
यातील अटक आरोपींची एनआयए विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. यात भोपाळच्या माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांना मुख्य आरोपी होत्या. या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. शहरातील भिक्कू चौकात झालेल्या या बॉम्बस्फोटमध्ये 6 मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.