Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम

mosami kewat by mosami kewat
July 30, 2025
in बातमी
0
सोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम

सोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम

‎
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक विजय!
‎
दिल्ली :
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्वपूर्ण ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या महत्त्वपूर्ण खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने विजयबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली होती.
‎
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात पोलीस सुप्रीम कोर्टात गेले होते. उच्च न्यायालयाचे आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, या विरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज सकाळी या संदर्भातील सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्यामुळे विजयबाई सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील त्यांच्या कायदेशीर लढ्याला अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या खटल्याच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले असून, हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे बोलले जात आहे. या केसमध्ये पीडित सुर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर, ॲड. प्रतीक बोंबार्डे, ॲड. कीर्ती आनंद यांनी बाजू मांडली.

Tags: caseJusticeForSomnathSuryawanshiMaharashtra StatePolice CustodyprakashambedkarSomnath Suryawanshi casesupreme court
Previous Post

मालेगाव बॉम्बस्फोट: १७ वर्षांनंतर न्यायाची प्रतीक्षा, उद्या लागणार निकाल

Next Post

आंबेडकरी नेतृत्वाचं बळ अन् विजयाबाईंचा विजय!

Next Post
आंबेडकरी नेतृत्वाचं बळ अन् विजयाबाईंचा विजय!

आंबेडकरी नेतृत्वाचं बळ अन् विजयाबाईंचा विजय!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे सफाई कामगाराचा मृत्यू; १ कोटींच्या मदतीसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
बातमी

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे सफाई कामगाराचा मृत्यू; १ कोटींच्या मदतीसह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

by mosami kewat
February 23, 2026
0

औरंगाबाद : महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत असताना एका सफाई कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली...

Read moreDetails
औंढा नागनाथ तहसील कार्यालयात रेशन कार्ड घोटाळा उघड; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

औंढा नागनाथ तहसील कार्यालयात रेशन कार्ड घोटाळा उघड; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

February 23, 2026
बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीला प्रकाश आंबेडकरांचा फोन; न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे दिले आश्वासन !

बीडमधील मृत GST अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीला प्रकाश आंबेडकरांचा फोन; न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे दिले आश्वासन !

February 23, 2026
फ्रान्स राफेल विमानाचे सोर्स कोड शेअर करणार नाही; पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपले वैमानिक मारले जावेत अशी मोदींची इच्छा आहे ?

फ्रान्स राफेल विमानाचे सोर्स कोड शेअर करणार नाही; पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपले वैमानिक मारले जावेत अशी मोदींची इच्छा आहे ?

February 23, 2026
अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे

अखेर अनुसूचित जातीच्या वस्तीतील विकासकामांना पालकमंत्र्यांनी दिलेली स्थगिती मागे

February 23, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home