Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 10, 2023
in बातमी
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग!
       

सहा महिन्यात कोसळलेल्या उड्डाणपुलावरून भाजपवर साधला निशाणा

अकोला : ‘अकोल्याच्या जनतेचे कर स्वरूपात दिलेल्या शेकडो कोटी रुपयांची फळे सहा महीने सुद्धा चाखता आली नाहीत’ असे ट्विट करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेला अकोला शहरातील उड्डाणपूल सहा महिन्याच्या आत खचला आणि गेले 7 महीने झाले तरी त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही, यावरून  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे भाजपवर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेला शहरातील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूल अवघ्या सहा महिन्याच्या आत खचला. आता गेल्या 8 महिन्यांपासून त्याच्या दुरुस्तीचे कार्य सुरू अद्याप तो उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.

‘मी महिन्यातून दोनदा अकोल्यात येतो आणि प्रत्येक वेळी किमान ५ दिवस तरी राहतो. प्रत्येक वेळी माझे वाहन अशोक वाटिका चौकातून जाते तेव्हा मला अपेक्षा असते की कोसळलेला उड्डाणपूल दुरुस्त होऊन कार्यान्वित झाला असेल. पण, मी प्रत्येक वेळी निराश होतो.’ असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात १६३ कोटींच्या खर्चातून तीन वर्षांत दोन उड्डाणपूल उभारण्यात आले. त्यावरून २८ मे २०२२ पासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्यात आले होते. अशोक वाटिका चौक, अमरावती मार्ग व टॉवर चौकात पुलावरून ‘रॅम्प’ मार्ग ठेवण्यात आला, तर बसस्थानक चौकात भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्याच्या आता १९ डिसेंबर २०२२ रोजी खचला. या मार्गाखालून गेलेली ६०० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या मार्गाखालील राखेचा भराव बाहेर येऊन वाहून गेला. परिणामी, हा मार्ग बंद करावा लागला. गेल्या 8 महिन्यांपासून या पुलाचे दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. अद्यापही हे कार्य पूर्ण झाले नसल्याने पुलावरून अमरावतीकडे जाणारी वाहतूक बंद आहे. वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

‘या विलंबासाठी कोण जबाबदार आहे नगरसेवक, आमदार की खुद्द केंद्रीय मंत्री यावर चर्चा करायची नसून मला एवढंच दिसतंय की, अकोल्यातील जनतेने कर स्वरूपात भरलेल्या शेकडो कोटींची फळे त्यांना ६ महिने सुद्धा चाखता आली नाहीत, कारण केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झाल्याच्या ६ महिन्यांतच पुल कोसळला.’ असे म्हणत त्यांनी निकृष्ट दर्जाच्या कामातून जनतेच्या पैशाचा कसा अपव्यय सुरू आहे याकडे लक्ष वेधले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे हे ट्विट म्हणजे त्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याची अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

English Tweet :

I come to Akola twice a month and stay for at least 5 days every time I am here.

Every time my vehicle passes through Ashok Vatika Chowk, which is in the heart of the city, I hope to see the collapsed flyover repaired and operational. But, I am disappointed every time.

I don’t… pic.twitter.com/x2W6SP3bh2

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 10, 2023

Marathi Tweet :

मी महिन्यातून दोनदा अकोल्यात येतो आणि प्रत्येक वेळी किमान ५ दिवस तरी राहतो. प्रत्येक वेळी माझे वाहन अशोक वाटिका चौकातून जाते, जे की शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तेव्हा मला अपेक्षा असते की, कोसळलेला उड्डाणपूल दुरुस्त होऊन कार्यान्वित झाला असेल. पण, मी प्रत्येक वेळी निराश होतो.… pic.twitter.com/JYkr2OBzs3

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 10, 2023

       
Tags: AkolaGeneral electionsLoksabhaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

स्पर्धा परीक्षार्थींसाठी वंचित मैदानात

Next Post

‘आरएसएसचा काळा इतिहास पुसला जाणार नाही, कावळ्याने कितीही आंघोळ केली तरी तो बगळा होत नाही!’

Next Post
जाती अंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य – ॲड. आंबेडकर

‘आरएसएसचा काळा इतिहास पुसला जाणार नाही, कावळ्याने कितीही आंघोळ केली तरी तो बगळा होत नाही!’

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कारंजामध्ये रेशन धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
बातमी

कारंजामध्ये रेशन धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

by mosami kewat
July 21, 2025
0

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. गुप्त माहितीच्या आधारे कोळी तुळजापूर शिवारातील...

Read moreDetails
जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

July 21, 2025
मोठी बातमी! बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

मोठी बातमी! बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

July 21, 2025
पुण्याजवळ वेद विहार समोर भीषण अपघात; रिक्षा चालकाची थरारक सुटका

पुण्याजवळ वेद विहार समोर भीषण अपघात; रिक्षा चालकाची थरारक सुटका

July 21, 2025
मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर कायम; अंधेरी सबवे बंद

मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर कायम; अंधेरी सबवे बंद

July 21, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home