Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट – ॲड. प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
January 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

इंदोरा मैदानावर जनसागर उसळला!

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांची ऐतिहासिक इंदोरा मैदानावर आज सभा पार पडली. नागपुर जिल्ह्यात इंदोरा मैदानात जनसागर उसळला होता. या सभेला नागपूरच्या विविध प्रभागांतील हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहून मोठे शक्तिप्रदर्शन केले. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच ‘वंचित’ने नागपुरात घेतलेल्या या आघाडीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.

लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट – ॲड. आंबेडकर

सभेला संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि भ्रष्ट व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, “संविधानाच्या विरोधात असणारी व्यवस्था म्हणजेच ‘मनुवादी व्यवस्था’ होय. आज देशात ४०० कोटींचे काम ८०० कोटींमध्ये दाखवून सरकारी तिजोरीची उघड लूट केली जात आहे. याच लुटलेल्या पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा आणि लोकशाही यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

“एकपक्षीय हुकूमशाही धोक्याची घंटा”

बिहार निवडणुकीच्या अनुभवाचा दाखला देत आंबेडकर पुढे म्हणाले, “जर हीच प्रथा सुरू राहिली, तर भविष्यात राजकीय पक्षांचे अस्तित्व नगण्य होईल. विरोधी पक्ष संपले की देशात ‘एकपक्षीय हुकूमशाही’ यायला वेळ लागणार नाही. तेव्हा सत्ताधारी हवे तसे वागतील आणि त्यांच्याविरोधात लढणे अशक्य होईल. त्यामुळे संघटन जिवंत ठेवणे, हेच संविधानाचे खरे संरक्षण आहे.”

सत्ताधारी होण्यासाठी हीच खरी वेळ!

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या समुदायाला आवाहन करताना ते म्हणाले, “आपल्याला मिळालेल्या मतांची भीती समोरच्याला वाटली पाहिजे. या विचारांचा माणूस केवळ राजकारणी नाही, तर आता ‘सत्ताधारी’ झाला पाहिजे. ही संघर्षाची वेळ आहे; तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानासोबत आहात की पैशासोबत, हे आता ठरवा. जोपर्यंत संविधानिक व्यवस्था टिकून आहे, तोपर्यंतच वंचित वर्ग सुरक्षित आहे.”

नागपुरात भाजप आणि काँग्रेस यांच्या पारंपरिक लढतीत वंचित बहुजन आघाडीने आपला स्वतंत्र अजेंडा मांडल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. इंदोरा मैदानावरील या विराट सभेने नागपूरच्या राजकीय मैदानात ‘वंचित’ने आपली मोहर उमटवली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. 

यावेळी या जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. या सभेत इंदिरा सभा घोषणांनी दुमदुमून गेला होता.


       
Tags: ElectionElection campaignElection newsLocal body electionMaharashtraMunicipal CorporationnagpurPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindiavote
Previous Post

ब्रीजवाडीत वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा धडाका! प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात

Next Post

नांदेडमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात! वसरणीत ‘वंचित-काँग्रेस’ युतीचे भव्य शक्तीप्रदर्शन; रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद

Next Post
नांदेडमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात! वसरणीत ‘वंचित-काँग्रेस’ युतीचे भव्य शक्तीप्रदर्शन; रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद

नांदेडमध्ये सुजात आंबेडकरांचा झंझावात! वसरणीत 'वंचित-काँग्रेस' युतीचे भव्य शक्तीप्रदर्शन; रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !
बातमी

अकोल्यातील धम्म मेळाव्यात उसळला लाखोंचा जनसागर !

by mosami kewat
October 22, 2026
0

ॲड. प्रकाश आंबेडकर : दिवाळीआधी सरकारने मदतीची आकडेवारी जाहीर करावी अकोला : गेली 42 वर्ष अखंडपणे चालू असलेल्या अकोल्यातील धम्म...

Read moreDetails
हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

हातरुण दुर्घटना : धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीत विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू, सहा जण जखमी; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून कुटुंबाचे सांत्वन

October 20, 2026
केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

केवळ उत्सव नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा आविष्कार : ॲड. प्रकाश आंबेडकर 

October 20, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; मुख्यमंत्र्यांनी तरी दिवाळी साजरी करावी!

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात; मुख्यमंत्र्यांनी तरी दिवाळी साजरी करावी!

October 20, 2026
सिंचन, वृक्ष लागवड, भूजल संवर्धन, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारामुळे राज्यात अभूतपूर्व दुष्काळ – राजेंद्र पातोडे

सिंचन, वृक्ष लागवड, भूजल संवर्धन, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारामुळे राज्यात अभूतपूर्व दुष्काळ – राजेंद्र पातोडे

October 19, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home