Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा

Akash Shelar by Akash Shelar
October 26, 2026
in बातमी
0
दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा
       

मुंबई : सत्तेमध्ये जे आरएसएसवाले बसले आहेत. देवा, धर्माच्या नावाने यांनी मते मागितली आणि सत्तेत आले.या दुष्काळाच्या काळात शासनाने पाण्याची, खाण्याची व्यवस्था केली नाही, तर या जिल्ह्यातील आरएसएसचे, भाजपाचे, बजरंग दलाचे प्रमुख असोत या सर्वांच्या घरासमोर आम्ही लाईन लावून सांगणार आहोत की, जेवणही दे आणि पाणी सुद्धा दे. असा इशारा त्यांनी वाशिम येथील धम्म मेळाव्यात बोलताना दिला.

ॲड. आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले. त्यांनी म्हटले की, सरकारकडे ज्वारीचा, बाजरीचा, तांदळाचा, गव्हाचा आणि डाळींचा साठा किती आहे? हे सांगावे. इथल्या शेतकऱ्यांना सांगतो की, तुम्हाला सरकारचे 5 हजार रुपये मिळणार नाहीत. या सरकारची देण्याची दानत नाही. दिवाळीनंतर दुष्काळाची परिस्थिती अजून भयानक होणार आहे.

सरकारकडून दरवर्षी बेरोजगाराला काम मिळावं म्हणून रोजगार हमी योजनेच्या नावाखाली 170 रुपये नोकरदार, व्यावसायिकांकडून सेज रूपाने घेतात. ग्रामीण भागातील जो बेरोजगार आहे त्याच्या हाताला काम देण्यासाठी शासन 170 रुपये घेते. दरवर्षी 36 हजार कोटी रुपये यातून जमतात. रोजगार हमी योजनेला यातून निधी पुरवला जायचा. सरकार आजही हा पैसा गोळा करतो.

या दुष्काळी परिस्थिती या लोकांच्या हाताला काम सरकार कसे देणार?पोटाची आग मस्तकात जाऊ देऊ नका. पोटाची आग ज्या दिवशी मस्तकात जाईल, त्यादिवशी कोण भस्म होईल? हे सांगता येणार नाही.दिवाळीनंतर अनेक गावांत दुष्काळ दिसायला सुरुवात होईल. असाही इशाराही ॲड. आंबेडकरांनी यावेळी दिला.

इथले विरोधी पक्ष, राहुल गांधीपासून ममता बॅनर्जीपर्यंत या सगळ्यांना SIR सुरू होण्याआधी किती मते गाळली जातील, याची आकडेवारी दिली होती. महाराष्ट्राची सव्वा दोन कोटी मते गाळली जातील, ही आकडेवारी आपणच समोर आणली होती आणि SIR मधून सव्वा दोन कोटी मते वगळण्यात आली. असे म्हणत यावर्षी सव्वा दोन कोटी मते वगळली, तर पुढच्या वर्षी सव्वा दोन कोटी मतदान वगळणार असल्याचेही ॲड. आंबेडकरांनी अधोरेखित केले.

ओबीसींच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटले की, मी इथल्या ओबीसींना सांगतो की, धर्म, देवाच्या नावाने तुमचं मतदान इथल्या सरकारने घेतले आणि तुमच्या उरावर जरांगेला बसवले. जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात पूर्वी न्हावी, कुंभार, लोहार, माळी, धनगर निवडून यायचे. आता ते बोंबलत बसले आहेत की, आमचा एकही माणूस निवडून येत नाही. महात्मा फुलेंनी सांगितले की, विद्या जोपर्यंत आहे, तोपर्यंत ज्ञान आहे. ज्ञान आहे तोपर्यंत आपल्याला अक्कल आहे. ती आपण वापरली पाहिजे. स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करावे लागेल. हे ओबीसींनी लक्षात घ्यावे. सर्व ओबीसींनी आपली मान भाजपा, आरएसएसच्या खांद्यावर टाकली आणि त्यांनी मानेवर सुरी फिरवून जरांगे पाटील तुमच्या बोकांडी मारला. आता म्हणत आहेत की, आमच्या नोकऱ्या गेल्या. मेडिकल, इंजीनियरिंगमध्ये आम्हाला जागा मिळत नाही. जरांगे पाटील ते खातोय. ओबीसींना सांगतोय की, आरक्षण ही भीक नाही. पूर्वीच्या राजेशाहीमध्ये शिवाजी महाराज सोडले तर ओबीसी, दलित, आदिवासी यांना चोपदार होण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. त्यामुळे स्वतःचे अधिकार स्वतःला वाचवावे लागतील.

इथला ओबीसी अजून राजा झालेला नाही. ज्या दिवशी तो स्वतःच्या पायावर उभा राहील, इथल्या आरक्षणवाद्यांबरोबर तो समझोता करून सत्तेमध्ये येईल, तेव्हाच तो राजा झालेला असेल. म्हणून मताचा जो अधिकार आहे, तो वाचवण्याची लढाई सुरू झाली आहे. मतदानाचा अधिकार म्हणजेच स्वातंत्र्य आहे. असे म्हणत त्यांनी ओबीसींना राजकीय प्रगतीचा मार्ग सांगितला.

यावेळी बोलताना ॲड. आंबेडकरांनी वाशिम जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा भाष्य केले. वाशिमच्या अविकसितपणाला वाशिममधील जनता जबाबदार आहे. वाशिमच्या हळदीवर सांगली जिल्हा मोठा झाला. इथल्या सोयाबीनवरती अनेक कारखाने आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशात निघाले. तरीही वाशिम अविकसित आहे. येत्या काळात परिस्थिती अजून भयानक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या धम्ममेळाव्यात लाखो जनतेची उपस्थिती होती. तसेच, या प्रसंगी राष्ट्रीय कार्यकरिणी सदस्य नतिकुद्दीन खतीब, सदस्या अरुंधती शिरसाट, किरण गीऱ्हे, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष यू.जी. बोराडे, अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटी सदस्य,भन्ते गण आणि पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: dhamm melavaMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा
बातमी

दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा

by Akash Shelar
October 26, 2026
0

मुंबई : सत्तेमध्ये जे आरएसएसवाले बसले आहेत. देवा, धर्माच्या नावाने यांनी मते मागितली आणि सत्तेत आले.या दुष्काळाच्या काळात शासनाने पाण्याची,...

Read moreDetails
ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार

ऐन दिवाळीत आनंद हरपला ; गोरगरीब कुटुंब ‘आनंदाचा शिधा’ पासून वंचित राहणार

October 26, 2026
नागपूर पदवीधर मतदारसंघ: स्ट्राँग रूमचे १५ CCTV कॅमेरे बंद; वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

नागपूर पदवीधर मतदारसंघ: स्ट्राँग रूमचे १५ CCTV कॅमेरे बंद; वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

October 26, 2026
कुंभमेळ्याचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवा – सुजात आंबेडकर

कुंभमेळ्याचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवा – सुजात आंबेडकर

October 26, 2026
या दुष्काळात स्त्रियांना मोठा फटका बसणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर

या दुष्काळात स्त्रियांना मोठा फटका बसणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर

October 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home