Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जातीय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला गुन्हा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 28, 2025
in बातमी
0
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा

       

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात “जातीय जनगणना न होणं ही माझी चूक होती” असे म्हणत एक प्रकारे आपल्या पक्षाच्या ऐतिहासिक अपयशावर झाक घालण्याचा प्रयत्न केला, मात्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर कठोर ट्विट द्वारे प्रतिक्रिया देत सांगितले की, जातीय जनगणना रोखणं ही चूक नव्हे, हा तर ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर केलेला कित्येक दशकांचा गुन्हा आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, राहुल गांधी हा मोठेपणाचा देखावा थांबवा. तुम्ही म्हणता की जातीनिहाय जनगणना न झाल्याची चूक केवळ तुमची आहे आणि त्यामुळे ओबीसींना त्यांचा हक्क मिळाला नाही. राहुल गांधी, सर्वप्रथम हे समजून घ्या की ही चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला एक गुन्हा आहे. आणि हा गुन्हा तुमच्या आजी इंदिरा गांधी, तुमचे वडील राजीव गांधी, तुमची आई सोनिया गांधी, तुम्ही स्वतः आणि तुमची काँग्रेस पार्टी या सगळ्यांनी मिळून दशकानुदशके बहुजनांवर केला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढील मुद्द्यांकडे लक्ष वेधले –

• तुमच्या आजी इंदिरा गांधी यांनी मंडल आयोगाचा अहवाल १० वर्षे दाबून ठेवला.

तुमचे वडील राजीव गांधी मंडल आयोग लागू करण्यास आणि ओबीसींना आरक्षण देण्यास विरोधात होते. याचे पुरावे त्यांच्या लोकसभेत दिलेल्या भाषणांमध्ये सापडतात. माझे मित्र आणि तत्कालीन पंतप्रधान वी. पी. सिंग, माझे सहकारी आणि मी मिळून मंडल आयोगाच्या शिफारसी आणि ओबीसींसाठी २७% आरक्षण लागू केलं.

तुमची आई सोनिया गांधी, ज्या यूपीए आघाडीच्या अध्यक्षा होत्या, त्यांनी यूपीए सरकारमध्ये जातीय जनगणनेचा मुद्दा दाबून ठेवला. २०११ मध्ये समाजवादी पक्षांनी जनगणनेत जात नोंदवण्याची मागणी केली, तेव्हा तुमची काँग्रेस पार्टी आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या मागणीचा विरोध केला. जातीय जनगणनेची मागणी वाढल्यावर शेवटी हार मानून तुमच्या पक्षाने जनगणना केली, पण आजपर्यंत त्या जनगणनेचे आकडे तुम्ही जाहीर केलेले नाहीत.

राहुल गांधी, ना तुम्ही दलित समाज समजू शकता, ना त्यांच्या समस्या. हीच बाब आदिवासी, ओबीसी आणि भारतातील अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम आणि बौद्ध समाज यांच्या बाबतीतही लागू होते. फक्त फोटोशूट करून आणि “जय भीम” ओरडून कोणालाही बहुजनांच्या समस्या समजत नाहीत. आणि हो, पुढच्यावेळी अर्धवट खोटं नाही, तर पूर्ण सत्य बोला !तेही बोला की बहुजनांना वंचित ठेवण्याच्या गुन्ह्यात तुमच्या आजी इंदिरा गांधींपासून, वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी, तुम्ही स्वतः आणि तुमची काँग्रेस पार्टी सर्वजण सहभागी आहात.


       
Tags: CongressPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

उदगीरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश सोहळा भव्यदिव्य पार पडला; शेकडो नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

Next Post

वंचित बहुजन आघाडीत उदगीर तालुक्यात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Next Post
वंचित बहुजन आघाडीत उदगीर तालुक्यात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

वंचित बहुजन आघाडीत उदगीर तालुक्यात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
तुमच्या आया- बहिणींचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर देने कितपत योग्य आहे? ही कसली भाषा आहे?
article

तुमच्या आया- बहिणींचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर देने कितपत योग्य आहे? ही कसली भाषा आहे?

by mosami kewat
August 18, 2025
0

राजेंद्र पातोडे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करण्यासंदर्भातील प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. 'तुमच्या आया- बहिणींचं...

Read moreDetails
Akola : वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यात कावड भक्तांचे स्वागत

Akola : वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यात कावड भक्तांचे स्वागत

August 18, 2025
बार्शीटाकळीत वंचित बहुजन आघाडीची बैठक: निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार

बार्शीटाकळीत वंचित बहुजन आघाडीची बैठक: निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचा निर्धार

August 18, 2025
Pune Monsoon : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाची दमदार वापसी; वाहतूक संथ, यलो अलर्ट जारी

Pune Monsoon : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाची दमदार वापसी; वाहतूक संथ, यलो अलर्ट जारी

August 18, 2025
Shubhanshu Shukla : ‘अॅक्झिअम-४’ मोहीमेतील पायलट शुभांशु शुक्ला यांचे भारतात शानदार स्वागत

Shubhanshu Shukla : ‘अॅक्झिअम-४’ मोहीमेतील पायलट शुभांशु शुक्ला यांचे भारतात शानदार स्वागत

August 18, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home