नरेंद्र मोदींकडून ५ प्रश्नांची उत्तरे मागण्याचे केले आवाहन!
मुंबई : १८व्या #G20Summit साठी नवी दिल्ली येथे येणाऱ्या सर्व सदस्य व पाहुण्यांना उद्देशून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय मार्मिक ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे या सदस्यांनी मागावित असे आवाहन त्यांनी केले आहे.
“नवी दिल्ली येथे १८व्या #G20Summit ला येणाऱ्या सन्माननीय सदस्य व पाहुण्यांचे भारतात सहर्ष स्वागत.
ज्या लोकांचे मी प्रतिनिधित्व करतो त्यांच्यावतीने कृपया आपण मोदींकडून या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मागावी” असे आवाहन करीत त्यांनी पुढील ५ प्रश्न विचारले आहेत.
१. अनेक महिलांचे बलात्कार करून त्यांना क्रूरपणे संपविण्यात आलं, त्या मणिपूर हिंसाचारामध्ये ख्रिश्चन-कुकी जमातीचा जातीय नरसंहार राज्य सरकार पुरस्कृत होता का?
२. भारतात राजरोसपणे आणि कायद्याच्या कुठल्याही भीतीशिवाय जातीय भेदभाव आणि हिंसाचार का चालू आहे?
३. मानवी मलमुत्र हाताने उचलण्यासारख्या मानवी प्रतिष्ठा धुळीस मिळवणार्या जाती आधारित कामामध्ये किती लोक अडकले आहेत?
४. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात आतापर्यंत किती दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चनांना जमावाने ठेचून ठार मारले?
५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर देशातील संस्थापकांनी ज्या मूल्यांवर देशाला उभे केले, त्याला नरेंद्र मोदी आणि त्यांचा गुंड पक्ष बदलण्याच्या मागे का लागला आहे?
इंग्लिश आणि मराठीमध्ये केलेल्या या ट्विटमध्ये देशातील अतिशय ज्वलंत आणि धगधगत्या प्रश्नांकडे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष वेधले आहे.