Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व विकले – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात!

mosami kewat by mosami kewat
February 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व विकले – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात!
       

राफेलच्या ‘चाव्या’ आता अमेरिकेच्या हातात

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान खरेदीच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रीय संरक्षण आणि सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला बांधल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राफेल विमानांसाठी महत्त्वाचे सुटे भाग पुरवणाऱ्या फ्रेंच कंपनीची मालकी आता अमेरिकन कंपनीकडे गेल्याने भारताची सुरक्षा धोक्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे या तांत्रिक बदलाकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की,  डिसेंबर २०२५ मध्ये, अमेरिकन कंपनी ‘लोअर ग्रुप’ (Loar Group) ने ‘एलएमबी एरोस्पेस’ (LMB Aerospace) या फ्रेंच कंपनीची खरेदी केली. ‘एलएमबी’ ही कंपनी राफेल विमानांच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि रडारसाठी अत्यंत आवश्यक असलेले ‘स्पेशलाइज्ड हाय-परफॉर्मन्स कूलिंग विंग्स’ आणि ‘इलेक्ट्रिक मोटर्स’ तयार करते. याला राफेलची ‘अंतर्गत जीवन-रक्षक प्रणाली’ मानले जाते. (Prakash ambedkar)

राफेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते ITAR-free (अमेरिकन नियंत्रणापासून मुक्त) असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता कंपनीची मालकी अमेरिकेकडे गेल्याने हे सुटे भाग ‘युनायटेड स्टेट्स मुनिशन्स लिस्ट’ (USML) च्या कक्षेत येऊ शकतात.

भारताच्या सार्वभौमत्वाला धोका ―

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले आहे की, आता या मिशन-क्रिटिकल भागांच्या पुरवठ्यावर आणि दुरुस्तीवर अमेरिकन सरकारचे थेट नियंत्रण असेल. भारताने कोणाला सुटे भाग विकावेत किंवा कोणाकडून खरेदी करावेत, यामध्ये आता अमेरिकेचा हस्तक्षेप वाढणार आहे. (Prakash ambedkar)

आजवर आपले सुरक्षा विषयक निर्णय स्वतः घेणाऱ्या भारतासाठी, आपल्या फायटर जेट्सच्या चाव्या दुसऱ्या देशाच्या हातात असणे हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका आहे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. 

पुढे ते पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधताना विचारले की, मोदी राफेल खरेदीचा हट्ट का धरत आहेत? रशियन बनावटीचे Su-57E का खरेदी केले जात नाही? मोदींनी स्वतःला आणि देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेला विकला आहे असे ते म्हणाले.


       
Tags: americabjpDonald TrumpMaharashtranarendra modiPoliticalpoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

बीड जिल्ह्यात सुर्डीत पारधी कुटुंबांवर जीवघेणा हल्ला; घरे उध्वस्त, वंचित बहुजन आघाडीची पीडितांना भेट

Next Post

गलगोटिया प्रसंग – भारताची वैज्ञानिक शोकांतिका: ‘ना घर का ना घाट का’

Next Post
गलगोटिया प्रसंग – भारताची वैज्ञानिक शोकांतिका: ‘ना घर का ना घाट का’

गलगोटिया प्रसंग - भारताची वैज्ञानिक शोकांतिका: 'ना घर का ना घाट का'

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप
बातमी

सातारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार; सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप

by mosami kewat
March 12, 2026
0

सातारा : दहावी आणि बारावीच्या पेपरफुटीच्या बातम्या अधूनमधून समोर येत असतात. मात्र आता सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर...

Read moreDetails
OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

OBC क्रिमी लेयर ठरवताना केवळ पालकांचे उत्पन्न निकष ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

March 12, 2026
Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

Bigg Boss 19 Winner: ५० लाख आणि कार अजूनही मिळेना? गौरव खन्नाचा खळबळजनक खुलासा!

March 12, 2026
खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

खालापूरचा खूनी हल्ला, युक्रांद चळवळ व भारिपसह परिवर्तनवादी पक्ष-२

March 12, 2026
इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा "चिकन आऊट" होतील काय ?

इराण युध्दात ट्रम्प तात्या पुन्हा एकदा “चिकन आऊट” होतील काय ?

March 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home