Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

mosami kewat by mosami kewat
April 4, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

Election Commission : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजावर संशय व्यक्त करत, केंद्र सरकार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे निवडणूक आयोगावर ‘फ्रॉड’ (फसवणूक) केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारचा खोटरडापणा उघडा करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी S.I.R. च्या नावाखाली निवडणूक आयोगाने (Election Commission) ज्या एका प्रभागातील मतदान अस्तित्वात नाही असे म्हणून कमी केले आहे, त्या कुटुंबाचा मेळावा घेऊन माध्यमांसमोर हे सर्व उघडे केले असते, तर निवडणूक आयोग फ्रॉड करतोय हे सिद्ध करता आले असते.

Also Read : Rahuri Election 2026 : वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये एक धक्कादायक आकडा समोर आणला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, महाराष्ट्रात S.I.R. सर्वेक्षणाखाली तब्बल २ कोटी ९० लाख मतदार कमी होणार आहेत. जर इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली गेली, तर त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांच्या निकालांवर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी केवळ निवडणूक आयोगावरच नव्हे, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले आहे. निवडणूक आयोगाचा (Election Commission) हा तथाकथित ‘फ्रॉड’ पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी राहुल गांधींनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पीडित मतदारांच्या भेटी घ्यायला हव्या होत्या, असे त्यांनी सुचवले आहे. केवळ आरोप करण्यापेक्षा पुराव्यांसह मेळावे घेऊन हा विषय लावून धरला असता, तर आयोगाचा खोटरडापणा जगासमोर आला असता, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Also Read : पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

विशेष सघन पुनरीक्षण (Special Intensive Revision) ही प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून (Election Commission) मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, दुबार नावे काढण्यासाठी किंवा मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी राबवली जाते. मात्र, विरोधी पक्षांकडून वारंवार असा आरोप केला जात आहे की, या प्रक्रियेचा वापर करून विशिष्ट विचारसरणीच्या किंवा समुदायांच्या मतदारांची नावे यादीतून जाणीवपूर्वक कमी केली जात आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, निवडणूक आयोग यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Breaking NewsdemocracyElection commissionElection UpdateElectoral Rollindian politicsMaharashtra politicsPolitical ControversyPrakash AmbedkarRahul GandhiSIR SurveyVoter DeletionVoter listVoter Rights
Previous Post

Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा
बातमी

महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

by mosami kewat
April 4, 2026
0

Election Commission : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते...

Read moreDetails
Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

April 4, 2026
पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

पोलीस ठाण्यांमधील धार्मिक उदासीकरण आणि भोंदूगिरी थांबवा; वंचित बहुजन महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

April 4, 2026
गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात 'नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर' आंदोलन

गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन

April 4, 2026
श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home