Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ – प्रकाश आंबेडकर

mosami kewat by mosami kewat
February 20, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ – प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अमेरिकेने नुकत्याच घेतलेल्या काही निर्णयांचा दाखला देत, भारताने आपली ‘धोरणात्मक स्वायत्तता’ गमावली असून देश अमेरिकेच्या दबावाखाली झुकल्याचे त्यांनी सांगितल. मुद्रा मोदी ते मुजरा मोदी” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

६ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशानुसार, भारताने आपल्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांना अमेरिकेच्या हिताशी ‘संरेखित’ (Align) करण्याचे मान्य केल्यामुळे भारतीय वस्तूंवर लादलेले २५% अतिरिक्त शुल्क कमी करून ते १८ टक्क्यांवर करण्यात आले आहे. (Prakash ambedkar)

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या घडामोडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हटले की, अमेरिकेच्या अटी मान्य करणे म्हणजेच भारताने आपल्या सार्वभौमत्वाचे समर्पण करणे होय. ट्रम्प यांचा आदेश स्पष्ट करतो की, अमेरिका आता भारताच्या ऊर्जा निवडींवर (विशेषतः रशियाकडून होणारी तेल खरेदी) देखरेख ठेवणार आहे.

काय आहेत हे कार्यकारी आदेश?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियन तेलावर बंदी घातली होती. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने भारतावर दंड म्हणून २५% अतिरिक्त टॅरिफ लादले होते. मात्र, आता हे टॅरिफ काढले असले तरी, त्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची आणि अमेरिकेच्या सूचनांचे पालन करण्याची अट घालण्यात आल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर आंबेडकरांनी केला आहे. (Prakash ambedkar)

जेफ्री एपस्टीन प्रकरणाचा संदर्भ :

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ३० जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या जेफ्री एपस्टीन संबंधित फाईल्सचा दाखला दिला. २०१७ मधील एका ईमेलमध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय पंतप्रधान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी इस्रायलमध्ये नाचले आणि गायले, हे एपस्टीनचे वाक्य भारताच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे आहे, असे आंबेडकर म्हणाले. परराष्ट्र धोरणांच्या बाबतीत एका गुन्हेगाराकडून सल्ला घेतला जात होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

व्यापारी करारांवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की:

१. पूर्वी भारतीय उत्पादनांवर अमेरिकन टॅरिफ २.५% होते, जे आता १८% पर्यंत वाढले आहेत.

२. उलटपक्षी, भारत अमेरिकन निर्यातीला ‘शुल्कमुक्त’ प्रवेश देत आहे.

३. हे धोरण भारताच्या जागतिक व्यापार संघटनेतील (WTO) विकसनशील देशाच्या भूमिकेच्या पूर्णपणे विरोधात आहे.

सरकारची संदिग्ध भूमिका : 

९ फेब्रुवारी रोजी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी “तेल आयात राष्ट्रीय हितानेच होईल असे म्हटले असले तरी, अमेरिकेने तेल खरेदी बंद करण्याबाबत जो आरोप केला आहे, त्याचे खंडन केलेले नाही. यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या देशाचे संरक्षण आणि आर्थिक निर्णय जर टॅरिफच्या भीतीपोटी अमेरिकेच्या हितानुसार होणार असतील, तर हे स्वतंत्र भारताच्या सार्वभौमत्वाची विक्री करण्यासारखे आहे, असे टोकदार मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.


       
Tags: americaDonald TrumpEpstein fileGlobal newsMaharashtranarendra modiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

गलगोटिया प्रसंग – भारताची वैज्ञानिक शोकांतिका: ‘ना घर का ना घाट का’

Next Post

मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post
मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home