बारामती – बारामती येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती-इंदापूर मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आला, ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. हा हल्ला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, काटेवाडी येथे बस थांबलेली असताना, एका व्यक्तीने अचानक कोयता काढून दुसऱ्या प्रवाशावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रवाशाला तात्काळ बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
हल्ल्यानंतर गोंधळ उडाला आणि हल्लेखोराने स्वतःवरही कोयत्याने वार करून स्वतःला जखमी केले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले असून, त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, हा हल्ला वैयक्तिक वादातून झाल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी...
Read moreDetails






