Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष

फाळणीची जखम

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
September 17, 2021
in विशेष, सांस्कृतिक
0
फाळणीची जखम
0
SHARES
136
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

अलीकडेच भाजप सरकारने एक अधिसूचना जारी केली ज्यामध्ये म्हटले आहे की, २०२२ मध्ये म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षापासून १४ ऑगस्ट हा “फाळणी वेदना स्मृतिदिन” म्हणून साजरा केला जाईल. आपण असं गृहीत धरूया की, सत्तापक्षास भारत आणि पाकिस्तानातील असंख्य उदध्वस्त झालेल्या लोकांबद्दल खरोखर सहानुभूती आहे. फाळणीमुळे प्रभावित झालेले सर्वात मोठे समुदाय म्हणजे शीख, पंजाबी आणि सिंधी. या समुदायांवरील केंद्र सरकारचे प्रेम, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांना ज्या कुटिल पद्धतीने हाताळण्यात येत आहे त्यातून स्पष्टच दिसत आहे.


योगायोग हा आहे की, मी नेटफ्लिक्सवर “हाऊ टू बी टायरंट”(जुलमी कसे बनावे)  नावाची मालिका पाहिली आणि त्यानंतर काही दिवसांनी या नवीन घोषित केलेल्या स्मृतिदिनाची अधिसूचना माझ्या कानावर आली. उल्लेखलेली मालिका, इतिहासात कशाप्रकारे फॅसिस्ट आणि हुकूमशहांनी लोकांवर सत्ता मिळवली त्याचा छान खुलासा करते. यामध्ये इदी अमीन, मुअम्मर गद्दाफी, अॅडॉल्फ हिटलर, जोसेफ स्टालिन आणि सद्दाम हुसेन यांच्यासह विसाव्या शतकातील सर्वात जुलमी सत्ताधीशांचा मागोवा घेण्यात आला असून, त्या सर्वांच्या कार्यप्रणाली मधील समान धागा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व सत्ताधीशांनी वापरलेले मूळ सूत्र म्हणजे प्रतीकात्मक जखमेची निर्मिती होय. एखाद्या समुदायात  पीडित असल्याची भावना रूजवून, त्या समुदायाला त्याच्या दुःख निरसनाचा उपाय म्हणून हिंसा करण्यास उद्युक्त करणे व दुसऱ्या समुदायाला शत्रू मानून त्याचा तिरस्कार करण्यास भाग पडणे हे ‘प्रतीकात्मक जखमांतून’ साध्य केले जाते.


या मालिकेमध्ये आपण पाहू शकतो १९२० च्या दशकात, बेरोजगार आणि अयशस्वी कलाकार असलेल्या अॅडॉल्फ हिटलरने ज्यू लोकांना परके संबोधून जर्मन (आर्यन) लोकांचे शत्रू म्हणून त्यांना ओळख देण्यास सुरुवात केली होती. हॉलीवूड आणि अमेरिकन वित्त ज्यू नियंत्रित करतात आणि त्या काळात जर्मनीम मध्ये व्यापक प्रमाणात असलेली गरिबी व बेरोजगारी यांना ज्यू कसे कारणीभूत आहेत याचे रचित उभारायला हिटलर ने सुरुवात केली होती. हिटलर एक लहरी वक्ता होता. त्याच्या आक्रमक आणि जळजळीत भाषणांनी जर्मन लोकांमधील मोठा वर्ग आकर्षित झाला. ज्या जर्मनी देशाने आधुनिक जगातील सर्वोत्तम तत्त्ववेत्ते व विचारवंत दिले तोच देश हिटलरला स्वीकृती कसा देतो. हिटलर ने हे कसे साध्य केले? नेमक्या याच प्रश्नचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या मालिकेत करण्यात आला आहे. जे हास्यास्पद आणि तर्कहीन विचार आहेत ते तर्कावर आधारित बहुसंख्य मानवी समाजावर प्रभाव पाडण्यात कशा प्रकारे यशस्वी होतात आणि लोकांना हॉलोकॉस्टसारख्या  क्रूर हिंसा करण्यास कसे बाध्य करतात?


युगांडामध्ये, इदी अमीननेही समान रणनीती अवलंबली होती. वासाहतिक राजवटीच्या काळात पूर्व आफ्रिकेत रेल्वे नेटवर्क तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय प्रामुख्याने गुजराती आणि पंजाबी स्थलांतरितांना काम करण्यासाठी पाठवण्यात आले होते. यातील बरेच मजूर तेथेच थांबले व त्यांच्या भावी पिढ्या उद्योगधंदा आणि व्यावसायिक कौशल्य यांच्या जोरावर समाजामध्ये वरचे स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या. युगांडामधील बहुसंख्य लहान दुकाने आणि सेवाक्षेत्रांवर त्यांनी पकड जमवली.


१९७१ मध्ये युगांडा सैन्याचा कमांडर इदी अमीनने सत्ता काबीज करण्यासाठी आणि स्वत: ला राष्ट्रपती घोषित करण्यासाठी युगांडाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबोटे यांच्याविरुद्ध लष्करी बंड केले. त्यानंतर, त्याने विविध समुदायांना छळण्यास सुरुवात केली विशेषतः भारतीय समुदायांना ज्यांनी युगांडाला आपले घर मानले होते. हिटलरच्याच कार्यप्रणालीप्रमाणे इदी अमीनने भारतीय व इतर समुदायांना मूळ युगांडातील लोकांच्या गरिबी आणि कंगालीसाठी जबाबदार म्हणून चित्रित करण्यास सुरुवात केली. त्यांना प्रतीकात्मकपणे युगांडाचे शोषण करणारे आणि शत्रू म्हणून स्थान दिले. याचा परिणाम म्हणून, युगांडामधील स्थानिक लोक भारतीय समुदायावर हल्ले करू लागले. अचानकपणे अमीनने घोषित केले की, युगांडामधील भारतीयांना त्यांच्या बॅगा पॅक करून देश सोडण्यासाठी फक्त एक दिवस दिला जाईल. त्यापैकी बहुतेकांचा जन्म युगांडामध्ये झाला होता आणि त्यांना कुठेही जायचे नव्हते. ही इतिहासातील  वंशसंहाराची सर्वात भयानक घटना होती.


फॅसिस्टवादाच्या या हिंसक इतिहासापासून कोणी त्याच्या विरोधात उभा राहिल, कोणी त्यापासून प्रेरणा घेईल. १४ ऑगस्ट जो पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे त्याच दिवशी भारतात ‘वेदना’ दिवस साजरा करण्यातून भाजप सरकार काय साध्य करू पाहत आहे? भारतीय समाजाच्या बहुधर्मीय रचनेमध्ये दुफळी  निर्माण करण्यासाठी भाजपकडून सुरू असलेले प्रयत्न स्पष्टपणे मुस्लिमांना राक्षसी, शत्रू आणि हिंदूंना इतिहासातील शोषित म्हणून मांडण्याच्या रणनीतीवर अवलंबून आहेत. विसाव्या शतकातील जुलमी हुकूमशाहांसारखीच ही रणनीती आहे. भाषा, धर्म आणि संस्कृतीच्या अनेक बहुविविधतांसह एकरूप, शांतता पूर्ण आणि एकसंध राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याऐवजी, भाजप सरकार वरील कृतीतून स्वतःची विषारी दृष्टी समोर आणत आहे.


येणाऱ्या काळात प्रस्तावित १४ ऑगस्ट (फाळणी वेदना स्मृतिदिन) साजरा करून भूतकाळात लोकांनी अनुभवलेल्या आघातांच्या जखमा भरून काढता येणार नाहीत.परंतु, त्यातून प्रतीकात्मक शत्रूची निर्मिती करून एक मोठा देखावा बनवता येऊ शकतो. भाजप आणि आरएसएस या दोघांनी आधीच जाहीरपणे घोषित केले आहे की, भारतातील मुसलमान हे पाकिस्तान मध्ये असायला पाहिजेत. संघाच्या पुढाकाराने आणि न्याय व्यवस्थेच्या आधाराने केलेले बाबरी मस्जिदीचे उध्वंसन, त्यांनतर आलेले कायदेशीर निर्णय हे ‘हिंदू  पीडित आहेत’ याच तर्कहीनतेवर अवलंबून होते. ‘लव्ह जिहाद’च्या नावावर गळे काढून हिंदू मुलींना लैंगिक संबंधासाठी मुस्लीम मुलांकडून फसवले जात आहे आणि त्यातून हिंदू रक्ताला भेसळयुक्त बनवण्याचा घाट रचला जात आहे हे कथन पुढे आणता येते. यातून मुस्लिमांना राक्षशी, शत्रू व हिंदूंना पीडित म्हणून दाखवता येते. 

पुढच्या वर्षी लाल किल्यावरून भव्य देखावा प्रसारित केला जाईल ज्यात फाळणीच्या वेळी प्राण गमावलेल्या, रक्त सांडलेल्या हिंदूंच्या स्मृती जागवल्या जातील त्यातून लोकांच्या भावनांना उत्तेजित केले जाईल. आपण हे विसरता कामा नये की , मीडियाने पंजाब मधील शीख शेतकऱ्यांची विध्वंसक, दहशतवादी अशी प्रतिमा निर्माण करून वृत्तवाहिन्यांवरती प्रसारित करण्यात मोठी भूमिका बजावली. वास्तविक ते शेतकरी कोण आहेत? रोज कष्ट उपसणारे शेतकरी ज्या कायद्याने आपल्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे त्या कायद्या संदर्भात आपला आवाज ऐकला जावा म्हणून टाहो फोडत आहेत ही सत्य परिस्थिती दाखवण्याऐवजी मीडियाने त्याच्या उलट दाखवले. २०२२ साली ७५ व्या स्वातंत्र्यादिनी प्रधानमंत्री लाल किल्यावरून भाषण देतील तेंव्हा संघाच्या अल्पसंख्यांकांना बदनाम करण्याच्या कुटीलतेला लपवण्यासाठी त्यांना मगरीचे अश्रू कमी येतील काय?  


हा प्रश्नदेखील विचारला जाणे बाकी आहे की ,लोकांचे वैयक्तिक इतिहास आणि आठवणी सरकारला स्वतःच्या पक्षपाती उद्दिष्टांसाठी पुढे नेता येतील का? या देशाचे नागरिक म्हणून आपण आपल्या शोषणास नकार देऊ नये काय? आरएसएस जो फाळणीच्या वेदनेचा आणि भयाचा देखावा उभा करत आहे त्यात सामील न होण्यासाठी आपण प्रतिकार करू शकतो काय? या देशाचे लोक १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिना’ ऐवजी ‘शांतता आणि सलोखा दिन’ म्हणून साजरा करू शकतील काय? १४ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय नागरिकांनी प्रेमाची गाणी म्हणत कूच केलीच पाहिजे जेणेकरून भयाच्या, वेदनेच्या, जुलमी देखाव्यांना मुठमाती मिळेल.

लेखिका: रश्मी सहानी
अनुवादक: पृथ्वीराज शिंदे


       
Tags: lovezihadpartitionrashmisahneytyrent
Previous Post

“जैविक बुद्धीजीवी ” म्हणून झंझावाती कारकीर्द गाजवणाऱ्या डाॅ. गेल ऑम्वेट

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपयशी अमेरिका दौरा.

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपयशी अमेरिका दौरा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपयशी अमेरिका दौरा.

वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत
बातमी

वंचीत बहुजन आघाडी – शिवसेना युतीचे कार्यकर्त्यांकडून स्वागत

पुणे : वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीची घोषणा होताच पुण्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन ...

January 23, 2023
वंचित –सेना युती नव्या पर्वाच्या राजकीय अध्यायाचा आगाज – राजेंद्र पातोडे
राजकीय

वंचित –सेना युती नव्या पर्वाच्या राजकीय अध्यायाचा आगाज – राजेंद्र पातोडे

काहीही हातचे राखून न ठेवता एकूण एक प्रश्नांची उत्तरे देत आज डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे वंचित आणि शिवसेना ...

January 23, 2023
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन
बातमी

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे संयुक्त निवेदन

आम्ही एकत्र का आलो? देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू ...

January 23, 2023
ख्रिस्ती बांधवांच्या निषेध मोर्चाला वंचीतचा पाठिंबा; अंजलीताई आंबेडकरांचे संबोधन
बातमी

ख्रिस्ती बांधवांच्या निषेध मोर्चाला वंचीतचा पाठिंबा; अंजलीताई आंबेडकरांचे संबोधन

ख्रिस्ती समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये 13 जानेवारी 2023 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया वरती ख्रिश्चन बांधवांनी काढलेल्या निषेध मूक महामोर्चाला ...

January 14, 2023
मा. अशोकभाऊ सोनोने यांची हिंगोली जिल्हा कार्यालयाला भेट
बातमी

मा. अशोकभाऊ सोनोने यांची हिंगोली जिल्हा कार्यालयाला भेट

भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते मा.अशोकभाऊ सोनोने आज हिंगोली येथे आले असता वंचित बहुजन ...

January 14, 2023
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क