डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळ्वळीमध्ये वर्तमान पत्राचं महत्व ओळखून पाक्षिक आणि साप्ताहिक हि सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पंचमाळ समूहाला वरदानच ठरत. एका जणाला लिहता, वाचता येत होते त्याच्याकडूनच सामूहिक रित्याने वाचन केल्या जात असे. आणि त्यातून बोध घेतल्या जात असे. शिक्षण जस वाढत गेलं तसे सामूहिक वाचन बंद झाले. व तेच सामूहिक एकाकडून दुसरीकडे , दुसरीकडून तिसरीकडे अशा रीतीने सामुहिक वाचनाच्या जागी त्याला व्यक्तिगत वाचनाची सवय सुरवात झाली.
जशी आर्थिक परिस्थिती बदलली तशीच विकत घेऊन वाचन सुरुवात झाली. या प्रत्येक बदला मध्ये मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता असले किंवा सध्याचे प्रबुद्ध भारत असेल हे विकसित होत गेलं आणि त्याचबरोबर पंचमा समाजाचे आणि नव्या विचाराचा प्रसार आणि प्रचार आणि मान्यता आता सुरुवात झाली. याकारणास्थव वैदिक मनुवादी विषमवादी व्यवस्था हिला भेगा पडत गेल्या आणि या भेगांमुळे बदलण्याची गरज पडू लागली, याची मांडणी पाक्षिक, जनता, काव्य, सामाजिक संघटना यातून सुरुवात झाली. कुठलाही बदलता प्रवाह हा कायम स्वरूपी आणि चिरंतन ठेवायचा असेल तर विचाराची दिशा ही प्रगतिशील असली पाहिजे.
अमेरिकेमध्ये इब्राहिम लिंकन यांनी कृष्णवर्णीयांच्या वादातून नवीन अमेरिकन सोसायटी (समाज) तयार केला. हि बदलाची परंपरा अमेरिकेतल्या अनेक सामाजिक संघटनांनी सुरुवात ठेवली. अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय हे ख्रिश्चन आणि भेदभाव पाळणारा हा सुद्धा ख्रिश्चन. अमेरिकेत पुन्हा सामाजिक चळवळी यांची कृष्णवर्णीय प्रश्नांची धार कमी झाली. तशीच, त्याचा परिणाम नव्यानं भेदभाव दिसायला लागले.
भारतामध्ये पंचमा आणि अतिशूद्र समाज यांच्या चळवळीची धार कमी झाली, तसेच त्याचा फायदा वैदिक मनुवादी, विषमतावादी यांनी उठाव केला. आधी पूर्ण बदललेली व्यवस्था पुन्हा जुन्याच पद्धतीने जेथून जाण्याचा घात बांधलाय. परिवर्तनवादी चळवळीने व्यवस्था बदलतेय, माणसे बदलतायत यावरती विश्वास ठेवूनशीतलता दाखवणे या सर्व परिवर्तनवादी यांनी बाबासाहेबांचं एक महत्वाचं विश्लेषण लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे काठमांडू मध्ये कार्ल मार्क्स की भगवान बुद्ध दोघांची विचारसरणी तौलनिक रित्याने मांडली. कार्ल मार्क्स हा पिळवणूक हा शब्दप्रयोग करत असे, बुद्ध हे दुःख शब्दप्रयोग करत असत. यातून जे मार्ग सुचवले ते वेगवेगळे होते.
कार्ल मार्क्स ने कामगारांचं राज्य हा मुद्दा मांडला आणि शोषण कर्त्यांचं अंत. बुद्धाने विचारांचं परिवर्तन आणि त्या परिवर्तनातून दुःखाचं अंतःकरण. कार्ल मार्क्स चा मार्ग ताबडतोब लागू होऊ शकतो. पण कालांतराने शोषणकर्ता वर्ग निर्माण होणार नाही याची खात्री घेता येत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले बुद्धाचा परिवर्तन हाच मार्ग , हा लांब पत्त्याचा मार्ग आहे पण खात्रीलायक मार्ग आहे. तेव्हा ज्यांनी ज्यांनी पाक्षिक प्रबुद्ध भारत घेणं आणि वाचन बंद केलं त्यांनी त्यांनी आपल्याला परिवर्तनाच्या चळवळीतून काढून घेतले आहे आणि एकाप्रकारे प्रतिगाम्यांची मदत करतायत. परिवर्तनाचा सिद्धांत हा समूहाचा व्यावहारिक भाग होईल आणि दैनंदिन जीवनाचा भाग होईल त्याच वेळेस परिवर्तन वाद्यांना थांबण्याचा अधिकार आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकर