नुकतीच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक पार पडली या निवडणूकीत एकूण 19 उमेदवार होते त्यात महाविकास आघाडीचे भगीरथ भालके,भाजपा कडून समाधान औताडे तर वंचित बहुजन आघाडीचे बिराप्पा मोटे होते. हा मतदारसंघ तसा सातत्याने चर्चेत राहणारा ! याचे कारण देशभरातील वारकर्यांचे दैवत इथे आहे. याच पंढरपूरात संत गाडगेबाबांनी एक धर्मशाळा बांधुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ताब्यात दिली आहे.तसेच इथे वंचित बहुजन आघाडीची स्थापना सुध्दा झाली आहे. हाच मतदार संघ बाळासाहेब आंबेडकरांनी लढविलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातही येतो. याच पंढरपूरात सैनिकांचा अक्षम्य अपमान करणारे भाजपचे विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा आहे. याच पंढरपूरात गेले वर्षी बाळासाहेब आंबेडकरांनी देशभरात गाजलेल आंदोलन सुध्दा केले होते.हे आंदोलन केवळ मंदिर उघडुन दर्शन घेण्यासाठी नव्हते तर या मंदिराच्या भरवशावर अनेक लघु व्यावसायिकांची पोट होते त्यांच्या पोटाला भाकर मिळावी म्हणून हे आंदोलन होते.याच मतदारसंघात दिवंगत आमदार भारत भालके यांचा विठल सहकारी साखर कारखाना, भाजपच्या समाधान आवताडेंचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना तर भाजप आमदार प्रशांत परिचारकांचा दामाजी साखर कारखाना आहे. या मातब्बर कारखानदारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी कडुन धनगर समाजाचे विनाअनुदानित शाळेवर अस्थायी स्वरूपात शिक्षक असलेले बिराप्पा मोटे हे उमेदवार होते.या निवडणूकीच्या बाबतीत अनेक जाणकार मंडळी दबक्या आवाजात चर्चा करत होती कि, ‘या महामारीत निवडणूक घेतली नसती तर बरे झाले असते’. मी आणि दिशा शेख सुद्धा ९ एप्रिल पासून १७ एप्रिल पर्यंत इथेच होतो.या निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीने अंदाजे 45 आमदार ,10 खासदार ,12 मंत्री, अनेक जिल्हा परिषद सदस्य, कारखानदार, संचालक, गायक, प्रबोधनकार उतरवले होते. तर भाजपा ही कुठे कमी नव्हती त्यांनी सुध्दा दोन्ही विरोधी पक्षनेते ,50 आमदार, 12 -15 खासदार, काही उद्योजक उतरवले होते. म्हणजे एकूण 95 आमदार, 20 खासदार, 14 कॅबिनेट मंत्री,अनेक कारखानदार यांच्या विरोधात माञ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन कडवी झुंज देत होते.निवडणूकीत जसजशी चुरस येऊ लागली तशी महाविकास आघाडी कडून सभेत येऊन बसणार्यांना प्रती व्यक्ती 300 रुपय देत होते म्हणे. तर भाजपा कडून ही भरपूर पैसा सभेत येणाऱ्या मंडळीना देण्यात आला होता. या प्रस्थापित उमेदवारांनी पैस्याच्या बळावर अन् बाळासाहेब आंबेडकरांच्या धास्तीने या परिसरातील सर्व तिन चाकी, चार चाकी वाहने, सर्व मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, मार्केट मधील गाळे, सर्व हाॅटेल्स, लाॅजींग,माल वाहतूक गाड्या, सायकल रिक्षा,आचारी, आणि प्रसारमाध्यमे बुक करून तर काही गहाणात घेऊन टाकली होती.जर सभेत येऊन बसणार्यांना प्रती व्यक्ती ३००-४०० रुपय देत असेल तर मग मोदी- पवार मिडीयाला किती रूपयात विकत घेतले असेल ? याचा विचार न केलेलाच बरा.
पंढरपूर पोटनिवडणूकीत प्रसार माध्यमानी वंचित बहुजन आघाडीला का नाकारले ?
पंढरपूर-मंगळवेढा हा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मध्ये येतो ह्याच लोकसभा मतदार संघात ऍड प्रकाश आंबेडकर उमेदवार म्हणून उभे होते तेंव्हा त्यांना 37 हजार मते मिळाली तेंव्हा पासून प्रस्थापित पक्षांनी वंचितची धसकी घेतली होती प्रसार माध्यमानी ह्या मतदार संघातील नेमके प्रश्न कोणते ? याला अजिबात कव्हरेज दिले नाही. परंतु महाविकास आघाडी आणि भाजपच्या प्रत्येक सभा थेट प्रक्षेपण करून दाखवण्यात आल्या होत्या. घड्याळ आणि कमळाच्या अनेक सभा फेल गेल्या कारण सभेला माणसंच येत नव्हते. अजित पवार, जयंत पाटील आणि रोहीत पवारांनी गल्ली बोळात बैठका घेऊन सभा झाल्याचे भासवले आणि ती बैठक नसुन सभाच होती हे घसा कोरडा पडेपर्यंत बोंबलुन tv9 ने सतत दाखवले.परंतु भरगच्च अशा गर्दीच्या सभा बाळासाहेबांच्या झाल्या असून देखील या मोदी- पवारचा गुलाम असलेल्या मिडीयाने वंचित बहुजन आघाडीची एकही सभा दाखवली नाही.तसही वंचित बहुजन आघाडी प्रसार माध्यामाना भीक घालत नाही. आनंद शिंदे अमोल मिटकरी गोपीचंद पडळकर यांच्या सभेला गावातील सकाळच्या हरिपाठाला तरी लोक राहतात तव्हढेही लोक उपस्थित राहत नव्हते तरी ही tv9 abp माझा हे चॅनल त्यांच्या सभा थेठ प्रक्षेपित करत होते.
परंतु बाळासाहेबानी ९ सभा घेउन सुध्दा त्यांची एक ही सभा ह्या न्यूज चैनलने प्रसारित केली नाही. बाळासाहेब प्रत्येक सभेमध्ये या परिसरातील ज्वलंत आणि जिवंत प्रश्नांना वाचा फोडत होते आणि राष्ट्रवादी- भाजप हे लोकांच्या मुलभूत प्रश्नांना बगल देऊन एकमेकांचे लफडे सांगत होते. हे सर्व मिडीया बेशरमासारखे थेट महाराष्ट्राला दाखवत होते. यांना न जुमानता तपकिर शेटफळ येथिल बाळासाहेबांची पावसातील सभा प्रबुद्ध भारत, दिशा शेख, राहुल चव्हाण बबन शिंदे आणि धनगर शक्ती या युट्यूब चैनलने संपूर्ण महाराष्ट्राला दाखविली. शरद पवारा सारखी छत्री घेऊन भाषण केली नाही. ही सभा प्रसार माध्यमाने नाकारली पण वंचितांच्या सोशल मीडियाने नाही. जेंव्हा-जेंव्हा पत्रकार अडचणीत असतात तेव्हा बाळासाहेबांकडे येतात आणि बाळासाहेब त्यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहतात परंतु यापैकी एकाही पत्रकाराला बाळासाहेब व त्यांच्या सभा दिसल्या नाहीत हे दुदैव म्हणावे लागेल !
बाळासाहेबानी पंढरपूर शहरात ३ मंगळवेढा मध्ये १ ,तपकिर शेटफळ, नंदेश्वर, मरवडे, कासेगाव, खर्डी इत्यादी ठिकाणी सभा घेतल्या सर्वसामान्य मतदारांचा सभांना प्रचंड प्रतिसाद होता. आजही मतदारसंघातील ३५ गावांना पिण्याचे पाणी मिळत नाही, अनेक गावांना रस्ते नाही, मतदारांना गुलाम बनविण्यासाठी तिन्ही साखर कारखान्याची निर्मिती करून लोकशाहीचा खून करत ‘मालक’ झालेल्या लोकांनी पार मतदार संघाची ऐशीकी तैशी केली आहे. एकंदरीत सर्वच प्रश्नांची उकल बाळासाहेबानी आपल्या भाषणातून केली होती. पण ह्या विकाऊ मीडियाला थोडा ही फरक पडला नाही २०१८ ला ह्याच पंढरपूर मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली होती तेंव्हांही प्रचंड गर्दीचे सत्ता संपादन मेळावे बाळासाहेबांच्या नेतृत्वत होत होते तेंव्हा ही सुरवाती पासून वंचित ला प्रसार माध्यमाने नाकारके होतेच पण वंचितांच्या बहाद्दर तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोदी पवार मिडीयाला कोलले होते. तेव्हा कुठे झकमारत यांनी उर्वरित सभा दाखवल्या.निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण लढाई न्याय हक्कासाठी चालुच राहणार ! हे सर्व श्रेय जाते बाळासाहेबांच्या निष्कलंक नेतृत्वाला आणि वंचितांचा स्वकष्टाने आपल्या फेसबुकच्या माध्यमातून प्रचार करणार्या असंख्य तरुणांना. हिच वंचितची सोशल मीडिया सभाळणारी दबंग तरुणाई आता याच मोदी-पवार मीडियाला घोडे लाऊन विचारेल कि,सांगा पंढरपूर पोटनिवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला प्रसार माध्यमानी का नाकारले ?
गोविंद दळवी
राज्य उपाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी