Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

यवतमाळ: पुसद तालुक्यातील हिवळणीत पंचशील ध्वजावरून वाद, ‘वंचित’कडून गावकऱ्यांना पाठबळ

mosami kewat by mosami kewat
January 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
यवतमाळ: पुसद तालुक्यातील हिवळणीत पंचशील ध्वजावरून वाद, ‘वंचित’कडून गावकऱ्यांना पाठबळ
       

यवतमाळ : पुसद तालुक्यातील हिवळणी पालमपट येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेवर लावण्यात आलेल्या पंचशील ध्वज हटवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर निर्माण झालेल्या वादात  वंचित बहुजन आघाडीने मोठी भूमिका बजावली. या प्रकरणी प्रशासकीय कारवाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पूर्ण पाठबळ दर्शवले असून, पुन्हा त्याच ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेद्वारे ध्वज उभारण्याचे आश्वासन दिले आहे.

नेमके प्रकरण काय?

हिवळणी पालमपट येथील बौद्ध बांधवांनी ग्रामपंचायतीच्या जागेत पंचशील ध्वज लावला होता. मात्र, गावातील काही मनुवादी विचाराचे, प्रस्थापित राजकीय नेत्यांसोबत मिळून या ध्वजाच्या विरोधात तक्रार केली. या तक्रारीनंतर प्रशासनाकडून ध्वज हटवण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक बौद्ध बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर, जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव, भीम टायगर सेनेचे किशोर कांबळे आणि सोशल मीडिया प्रमुख मधुर खिल्लारे यांनी तातडीने गावाला भेट दिली. कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती जाणून घेतली.

यानंतर शेंबाळपिंपरी पोलीस चौकी येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद घागे, पुसदचे गटविकास अधिकारी आंदेलवाड, नायब तहसीलदार खाडे

यांच्यासोबत गावकऱ्यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर यांनी गावकऱ्यांना शांततेचे आवाहन करताना सांगितले की, “कोणीही कायदा हातात घेऊ नका. महसूल आणि पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करू.” तसेच, ज्या ठिकाणी पंचशील ध्वज होता, त्याच ठिकाणी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रशासन आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा सन्मानाने ध्वज उभारला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी हिवळणी पालमपट येथील मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवक तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थित होती.


       
Tags: BuddhistDr Babasaheb AmbedkarMaharashtraPanchshil flagpolicePoliticalREPUBLIC DAYVanchit Bahujan AghadiYavatmal
Previous Post

पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम: शिरड शहापूर येथे ‘भारतीय संविधान विचार जागर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात 

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम: शिरड शहापूर येथे ‘भारतीय संविधान विचार जागर’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात 

वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम: शिरड शहापूर येथे 'भारतीय संविधान विचार जागर' स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अशोक खरात प्रकरण तापले: आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न? जातीय कोनातून चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी
बातमी

अशोक खरात प्रकरण तापले: आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न? जातीय कोनातून चौकशीची ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

by mosami kewat
March 30, 2026
0

खरात यांना ‘मॅक्सिमम सिक्युरिटी’ द्या; मराठा की इतर जात? मुख्यमंत्र्यांना थेट सवाल मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड...

Read moreDetails
गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी; नियोजनाच्या अभावावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संताप

March 29, 2026
पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार

पुण्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद ; ओबीसी प्रश्नांवर ठाम भूमिका,ओबीसी नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला लवकरच भेटणार

March 28, 2026
IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम

March 28, 2026
अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

अशोक खरात प्रकरण हिमनगाचे टोक : अशोक खरात या प्रकरणातील मोठा साक्षीदार; कोठडीत त्याच्या जीविताला धोका!

March 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home