मुंबई : ऐतिहासिक आंबेडकर भवन, दादर येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची महत्वाची सभा उत्साहात पार पडली. या सभेला मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव उपस्थित होते.
यावेळी पूज्य भन्ते ज्ञान ज्योती, भन्ते विनाचार्या, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर तसेच भन्ते आकाश लामा एकाच मंचावर एकत्र उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी समाजाला आंदोलनाची दिशा दाखवत एकतेचा संदेश दिला.
महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या श्रद्धास्थानाचे प्रतीक असून त्याची मुक्तता होणे ही काळाची गरज असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. दीक्षाभूमी, नागपूर येथून चैत्यभूमी, मुंबईपर्यंत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. तिचा समारोप आज मुंबईत झाला.
हे आंदोलन बौद्ध समाजाच्या हक्क व स्वाभिमानासाठी ही लढाई सुरु असल्याचे मान्यवरांनी सांगितले. या सभेत मोठ्या उत्साहाने घोषणा देत बौद्ध बांधवांनी आपला निर्धार व्यक्त केला. पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.