विरार-वसई : वंचित बहुजन महिला आघाडी, विरार-वसई महानगरपालिका क्षेत्र आणि शिवशाही भिमशाही उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घे भरारी तुझ्या स्वप्नांची’ या कार्यक्रमाचे तिसरे पर्व पार पडले. विरार स्टेशनजवळील वसई विरार महानगरपालिका वाचनालय समाज हॉल येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यायात आले.
कार्यक्रमात दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विरार, नालासोपारा आणि वसई येथील विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे आयोजन वसई विरार मनपा क्षेत्र वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा गीता जाधव यांच्या मार्फत करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सुशांत पवार आणि प्रसिद्ध टीव्ही कलाकार सुवर्ण देसाई उपस्थित होते. पालघर जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय ढोके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले.
यावेळी ॲड. सुनील गुप्ता, भारतीय बौद्ध महासभेचे विरार शहर शाखा अध्यक्ष सुनील वेडे, व. वि. मनपा क्षेत्र महासचिव मा. सुधाकर इंगळे, उपाध्यक्ष अक्षय गुजर, उपाध्यक्ष मा. अनिरुद्ध कांबळे, विरार शहर महिला अध्यक्ष सारिकाताई सकपाळ, माजी महिला उपाध्यक्ष कल्पनाताई सोनकांबळे (वसई), आणि दक्षिण रायगडमधून दामोदर गव्हाणे, तसेच महिला संघर्ष समितीच्या हर्षाताई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात तिसरी ते बारावीपर्यंतच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नवनीत कंपनीच्या वह्या आणि पेन वाटप करण्यात आले. वसई विरारमधील संघटक आनंद पाडमुख यांनी सूत्रसंचालनासाठी सहकार्य केले.
विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत – ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका
शरद पवार तर भाजपचे हस्तकच - ॲड. प्रकाश आंबेडकरमुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान...
Read moreDetails