औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांविरोधात आज औरंगाबाद शहरात ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाला तरुणांपासून वृद्धांपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावत शहर दणाणून सोडले.
कार्यालयाजवळ तणाव; पोलिस-कार्यकर्ते
आमनेसामनेहा ‘जन आक्रोश मोर्चा’ आरएसएसच्या कार्यालयाकडे (बाबा पेट्रोल पंप जवळ) जात असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावत गर्दीला कार्यालयाकडे जाण्यापासून अडवले. या अडवणुकीमुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलिस आमनेसामने आले.
सुजात आंबेडकरांची उपस्थिती, ‘RSS मुर्दाबाद’च्या घोषणाया ‘जन आक्रोश मोर्चात’ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची उपस्थिती होती, ज्यामुळे भीमसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला. मोर्चात सहभागी झालेल्या युवक, महिला आणि नागरिकांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ‘RSS मुर्दाबाद’ च्या घोषणांनी औरंगाबाद दणाणून गेला.






