जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन !
अकोला: बार्टी, महाज्योती व सारथी फेलोशिप साठी संयुक्त परीक्षेदरम्यान नागपूर, पुणे,औरंगाबाद, कोल्हापूर या चारही परीक्षा केंद्रावर परत पेपरफुटीचा गैरप्रकार उघडकीस आला, विद्यार्थ्यांना झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या याआधी पण २४ तारखेला घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी २०१९ चा पेपर देण्यात आला होता या सततच्या पेपरफुटी ला कंटाळून अखेर सर्व विद्यार्थ्यानी परीक्षेवर बहिष्कार टाकला असून सदरची परीक्षा रद्द करून सर्वांना सरसकट फेलोशीपची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मागण्या मान्य न केल्यास येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेने दिला आहे.
अश्या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यलय मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. यांना देण्यात आले.
या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हाध्यक्ष धिरज गौतम इंगळे, उपाध्यक्ष अनिकेत शिरसाट, प्प्रसिद्धी प्रमुख अक्षय डोंगरे, सह मीडिया प्रमुख अंकुश धुरंधर, जिल्हा सचिव ऋषिकेश इंगळे,मतीन खान, सदस्य अंकित इंगळे, अंकुश ठाकरे, सोमेश दाभाड़े, पियूष हेरोळे, चंद्रप्रकाश हेरोळे यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.