Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

शोषणकर्त्यांपेक्षा शोषितांचेच समर्थन अधिक घातक

mosami kewat by mosami kewat
August 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
शोषणकर्त्यांपेक्षा शोषितांचेच समर्थन अधिक घातक
       

– संजीव चांदोरकर 

मला देशात गेल्या दहा वर्षात एक लाख शाळा बंद, म्हणजे दिवसाला २५ (!)  पडल्याचा राग नक्कीच येतो 

पण त्यापेक्षा जास्त राग येतो 

या निर्णयाला कोणताही विरोध न करता मम म्हणणाऱ्या त्या संबंधित अधिकाऱ्यांचा / संबंधित राजकीय जनप्रतिनिधींचा जे स्वतः जिल्हा परिषदा / म्युनिसिपल / किंवा सरकारी मदतीवर चालणाऱ्या शाळांमध्ये शिकून ..ते आज जे काही आहेत तेथपर्यंत पोचले आहेत…. 

एवढेच नाही तर त्यांचे रक्ताचे नातेवाईक, गावातील कुटुंबे अशाच शाळात शिकत आहेत.

अशा व्यक्तींच्या हृदयात काहीच कालवाकालव होत नसेल का? 

एकामागून एक सार्वजनिक उपक्रम गिळंकृत करणाऱ्या, शनसाला हाताशी धरून अस्तित्वात असणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांचे पंख छाटणाऱ्या ..

….खाजगी क्षेत्राच्या एलिट वर्गातील प्रवर्तक / लठ्ठ पगारावर काम करणारे / समर्थक व्यक्तींचा मला राग नक्कीच येतो 

पण त्यापेक्षा जास्त राग येतो अशा मध्यमवर्गीयांचा ज्यांनी सारे आयुष्य सार्वजनिक क्षेत्रात, बँकेत सुरक्षित नोकऱ्या करून, पे कमिशनमधून नियमितपणे पगारवाढ घेऊन, डीए, टीए, एलटीए घेऊन छान आयुष्य जगलेले स्त्रीपुरुष…

…….भारतासारख्या देशाला सार्वजनिक क्षेत्राची काय गरज आहे याबाबत एक ओळ देखील न वाचता सार्वजनिक उपक्रम, बँका यांच्या खाजगीकरणाचे समर्थक होतात 

आपल्या कंपनीच्या शेयर्सचे भाव वाढण्यासाठी, टार्गेट गाठण्यासाठी गरिबांना न झेपणारी भरमसाट कर्जे पाजणाऱ्या, आणि नंतर गरीब कर्जदारांनी ईएमआय वेळेवर भरला नाही म्हणून कर्जदारांकडून कोणत्याही मार्गाने वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांचा मला राग नक्कीच येतो 

पण त्यापेक्षा जास्त राग येतो त्याच गावातील, त्याच जातीतील , त्याच वस्तीतील, त्याच वर्गात जन्मलेल्या, वाढलेल्या रिंग लीडर्सचा आणि वसुली एजंट्सचा …जे स्वतःच धंदा वाढवण्यासाठी, वसुलीसाठी निरनिराळे मार्ग स्वतःच सुचवत असतात. 

ते पोटासाठी ही कामे करत असते तर समजून घेता आले असते. पण ही व अशी मंडळी स्वतःच्या हृदयाशी बेईमान झालेली असतात. 

अर्थव्यवस्थेतील स्पर्धा मारणाऱ्या, छोट्या / मध्यम स्पर्धकांना धंद्यातून उठवणाऱ्या मक्तेदारी / मोनोपॉली / महाकाय कॉपोरेटच्या प्रमोटर्स / डायरेक्टर्स मला राग नक्कीच येतो  

पण त्यापेक्षा जास्त राग येतो राजकीय अर्थव्यवस्था , क्लासिकल भांडवलशाही म्हणजे काय, मक्तेदारी कंपन्यांचा जागतिक इतिहास, मक्तेदारी कशी राजकीय आर्थिक निर्णय प्रक्रिया स्वतःच्या हितासाठी प्रभावित करते, ….

……. कशाचा अभ्यास करण्याचे कष्ट न घेता , स्वतः निम्न मध्यमवर्गात पिचत पडलेले लोक, पैसे देखील न घेता फुकटात, बिन बुलाए त्यांचे जीव जाईस्तो जे काही सुरू आहे त्याचे समर्थन करतात 


       
Tags: EconomicsMaharashtramarathi shalaPolitical
Previous Post

नाशिक : पूरग्रस्तांना तात्काळ मदत न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीचे आंदोलनाचा इशारा

Next Post

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; सुविधांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना

Next Post
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; सुविधांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; सुविधांबाबत प्रशासनाला दिल्या सूचना

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
बातमी

रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी अनोखी भेट; यवतमाळ नगरपालिकेत डॉ. नीरज वाघमारे बसवणार मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

by mosami kewat
August 27, 2026
0

यवतमाळ : रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा यवतमाळ नगरपालिका गटनेते व नगरसेवक...

Read moreDetails
म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !

म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी इत्यादी; विशेषतः सिनियर सिटीझन साठी !

August 27, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा आणि राजकीय वास्तव

August 27, 2026
लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

लाडकी बहीण योजनेला वळवलेला SC-ST चा ४,६०१ कोटींचा निधी परत करा; अन्यथा मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढू – राजेंद्र पातोडे

August 27, 2026
विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी आणि भविष्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; MPSC पेपर फुटीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त ! 

August 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home