लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या लातूर तालुका कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. तालुका अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सोहळ्याला मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, राज्य युवा कार्यकारिणीचे युवा नेते अमोल लांडगे, लातूर जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम, लातूर जिल्हा महासचिव रोहित सुमनशी, जिल्हा सचिव प्रशांत वाघाडे आणि शहराध्यक्ष सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तालुका अध्यक्ष सुनील कांबळे, समता सैनिक दलाचे कमांडर उपस्थित होते. तसेच, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अजनिकर, सुशील चित्ते, कय्यूम शेख, पुष्पाताई आणि त्यांच्या कुटुंबियांनीही कार्यक्रमात आपली हजेरी लावली. या उद्घाटन समारंभाला जिल्हा कमिटी, तालुका कमिटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी...
Read moreDetails






