भारताची स्टार बॉक्सर आणि दोन वेळा विश्वविजेती असणारी निखत जरीन हिने बॉक्सिंग मध्ये शानदार पुनरागमन करत वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स २०२५ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
तिने महिलांच्या ५१ किलोग्रॅम गटाच्या अंतिम फेरीत चायनीज तैपेईची बॉक्सर झुआन यी गुओ हिला ५-० च्या फरकाने एकतर्फी लढतीत पराभूत करून सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
या विजयासह निखत जरीनने आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या जवळपास २१ महिन्यांपासून सुरू असलेला तिचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. यापूर्वी तिने २०२३ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.





