नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट), उबाठा यातील अनेकांनी मूळ पक्षात घरवापसी केली आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये महाविकास आघाडीमधील इनकमिंग वाढताना दिसत आहे.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. गणेश गीते हे यापूर्वी भाजपमध्ये होते, मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून उमेदवारी घेतली होती.
आता ते पुन्हा भाजपमध्ये परतणार आहेत असे सांगितले जात आहे. गणेश गीते यांच्या सोबत काही माजी नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गीते हे भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे जवळचे मानले जातात. पुढील दोन दिवसांत गीते आणि त्यांच्या समर्थकांचा औपचारिक भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमधूनही भाजपात आउटगोइंग –
काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या प्रदेश कार्याध्यक्ष पदावर असलेले कुणाल पाटील यांनी देखील भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.