Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गुन्हेगारीमुळे नाशिक हादरले! वंचित बहुजन आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन; गुन्हेगारांच्या राजकीय ‘आकांवर’ कारवाईची मागणी

mosami kewat by mosami kewat
October 8, 2025
in बातमी
0
गुन्हेगारीमुळे नाशिक हादरले! वंचित बहुजन आघाडीचे पोलीस आयुक्तांना निवेदन; गुन्हेगारांच्या राजकीय ‘आकांवर’ कारवाईची मागणी
       

नाशिक : शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने नाशिक शहर पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे म्हणाले की, गुन्हेगारांना राजकीय पाठिंबा मिळत आहे आणि सत्ताधारी महायुतीच्या सर्व पक्षांकडून गुंड पोसले जात आहेत. त्यामुळे या ‘गुंड पोसणाऱ्या राजकीय आकांवर’ कठोर कारवाई करावी, अशी मागणी गांगुर्डे यांनी केली.

शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात खालील महत्त्वाच्या बाबी आणि कारवाईची मागणी केली आहे:

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरात नाशिक शहरात गुन्हेगारीने थैमान घातले आहे. या कालावधीत जवळपास ४६ खून झाले आहेत. यासह, जीवे मारण्याचा प्रयत्न, हत्याराचा धाक दाखवणे, ड्रग्स आणि अंमली पदार्थांचे अवैध धंदे, आणि गोळीबार प्रकरणांमुळे शहर हादरून गेले आहे.

  • या वाढत्या गुन्हेगारीवर चाप बसवण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांची छाननी करून त्यांच्यावर हद्दपारी किंवा तडीपारीची कारवाई करावी.
  • सध्या घडलेले गुन्हे पाहता अनेक गुन्हेगार हे सत्ताधारी पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे सत्तेतील नेत्यांसाठी समुपदेशन शिबीर आयोजित करावे.
  • अटक केलेल्या प्रत्येक गुन्हेगाराची त्यांच्या प्रभागात ‘धिंड’ काढण्यात यावी.
  • एमडी ड्रग्स सारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर कठोरपणे आळा घालण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत.

या शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्यासह ज्येष्ठ नेते आणि माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, महासचिव विनय कटारे, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, महिला जिल्हा अध्यक्ष उर्मिला गायकवाड, महासचिव प्रतिभा पानपाटील, संघटक सागर रिपोर्टे, युवा आघाडीचे मनोज उबाळे, शरद सोनावने आदी नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Nashik Shaken by Rising Crime VBA Delegation Submits Memorandum to Police Commissioner Demands Action Against Politically Shielded Criminals


       
Tags: crimeCrime ratecriminalJusticeMaharashtranashikpolicepoliticsVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

बार्टी महासंचालक सुनील वारे यांच्या विरोधात ‘संविधान’ कचऱ्यात सापडल्याने तीव्र संताप; वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे स्टेशन परिसरात धरणे आंदोलन

Next Post

धक्कादायक! सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील युवा अभिनेता बाबू छेत्रीची नागपुरात हत्या; एका मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post
धक्कादायक! सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटातील युवा अभिनेता बाबू छेत्रीची नागपुरात हत्या; एका मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

धक्कादायक! सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' चित्रपटातील युवा अभिनेता बाबू छेत्रीची नागपुरात हत्या; एका मित्राला पोलिसांनी घेतले ताब्यात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा
बातमी

प्रस्थापितांविरोधात सुजात आंबेडकरांचा एल्गार; बीडमध्ये वंचितची शक्तिप्रदर्शन सभा

by mosami kewat
November 20, 2025
0

बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ताकदीने लढून सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. वंचित बहुजन...

Read moreDetails
नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू - वंचित बहुजन आघाडी

नवी मुंबई : श्रमिकनगर झोपडपट्टीवासियांसाठी आम्ही लढू – वंचित बहुजन आघाडी

November 20, 2025
Mumbai : बौद्ध समाज संवाद दौरा मुंबईत उत्साहात पार

Mumbai : बौद्ध समाज संवाद दौरा मुंबईत उत्साहात पार

November 20, 2025
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जिंकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार!

November 19, 2025
वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

वंचित बहुजन आघाडीची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर!

November 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home