Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव

mosami kewat by mosami kewat
November 14, 2025
in बातमी, सामाजिक
0
नाशिकमध्ये बिबट्याचा थरार: सातपूरमध्ये 9 ते 10 जणांवर हल्ला; वंचित युवा पदाधिकाऱ्यांची धाव
       

नाशिक : नाशिक शहरातील सातपूर विभागातील संत कबीर नगर व कामकर नगर परिसरात आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास बिबट्याने उधळलेले थैमान पाहून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्थानिक नागरिकांवर अचानक केलेल्या या प्राणघातक हल्ल्यात 7 पुरुष आणि 1 महिलेसह एकूण 9 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या दुर्घटनेची बातमी मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा महानगर प्रमुख दिपक पगारे, महासचिव युवराज मनेरे, युवा उपाध्यक्ष कैलास मधुकर बेंडकुळे, तसेच युवा संघटक असलम सय्यद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

जखमी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी त्यांनी तत्परता दाखवत जखमींना सिव्हिल हॉस्पिटल तसेच श्री गुरुजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

सद्यस्थितीत जखमींवर उपचार सुरू असून स्थानिक प्रशासन, वनविभागाचे पथक आणि पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.

या घटनेनंतर सातपूर परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून शेलटर मध्ये रवानगी करण्यात आली आहे.


       
Tags: FarmerMaharashtranashikVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या प्रगती जगतापचा बौद्ध महासभेतर्फे जाहीर सत्कार

Next Post

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

Next Post
बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

बिहारमध्ये NDA ! 200 हून अधिक जागांवर विजय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर
बातमी

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

by mosami kewat
April 12, 2026
0

Pune : भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या सादरीकरणात होत असलेल्या विकृतीकरणाबाबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात...

Read moreDetails
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026
शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

Akola : शहीद सुशील तेलगोटे यांच्या कुटुंबीयांचे सुजात आंबेडकर यांच्याकडून सांत्वन

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home