यवतमाळच्या प्रादेशिक परिवहन विभागासह चिंतामणी ट्रॅव्हल्सवर १२ प्रवाशांचा खून आणि ४१ जनांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा ; वंचित बहुजन युवा आघाडीच्या राजेंद्र पातोडे यांची मागणी.
यवतमाळहुन मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशिक येथे भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर ४१ जण गंभीर जखमी झाले. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. या घटनेनेनंतर हप्तेखोर यवतमाळच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभागाला जाग आली असून, मोटर वाहन निरीक्षकांनी आज शनिवारी दुपारी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात धडक देण्याचे नाटक करीत बसेससह कागदपत्रांची तपासणी सुरु केलीय. बारा जीव गेल्यावर आणि ४१ प्रवाशी जखमी झाल्यावर परिवहन विभाग कारवाईचा दिखावा करीत आहे.सरकारने मृत आणि जखमी ह्यांना नुकसान भरपाई देण्यासोबत यवतमाळच्या प्रादेशिक परिवहन विभागासह चिंतामणी ट्रॅव्हल्स १२ प्रवाशांचा खून आणि ४१ जनाच्या खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहूजन आघाडी चे मिडिया पॅनेलिस्ट राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.